Maize Crop Cultivation agrowon
ॲग्रो विशेष

Maize Crop Cultivation : मका पिकाचे तंत्र शेतकऱ्यांनी विकसित करावे : प्रशांतकुमार पाटील

Cultivation Maize Crop : 'मका पीक लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. त्यामुळे मका पिकाचे तंत्र विकसित करून शेतकऱ्यांची उन्नती घडवून आणावी.

sandeep Shirguppe

Maize Improvement Project : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत मका सुधार प्रकल्पांमधील शास्त्रज्ञांनी मक्याच्या सुधारित जातीबरोबरच मका तण व्यवस्थापन व एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन यावरील केलेले संशोधन शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल, असे मत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी केले.

कसबा बावडा येथील मका सुधार प्रकल्पाच्या नूतन इमारत व मक्यावरील लष्करी अळी प्रयोगशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, 'मका पीक लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. त्यामुळे मका पिकाचे तंत्र विकसित करून शेतकऱ्यांची उन्नती घडवून आणावी.

'डॉ. पाटील यांच्या हस्ते कुरण प्रक्षेत्रावरील विकासकामांचे उदघाटन करण्यात आले. सदर प्रक्षेत्रावर आंतरराष्ट्रीय मका व गहू संशोधन संस्था, मेक्सिको अमेरिका यांच्यातर्फे प्रयोग घेतले जाणार आहेत.

तत्पूर्वी, विभागीय कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख व सहयोगी संशोधन संचालक डॉ. अशोकराव पिसाळ यांनी कुलगुरू डॉ. पाटील, कुलसचिव डॉ. विठ्ठल शिर्के, नियंत्रक सदाशिव पाटील, राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूरचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, विद्यापीठ अभियंता डोके यांचे स्वागत केले.

या वेळी मका सुधार प्रकल्पाची माहिती डॉ. सुनील कराड यांनी दिली. कार्यक्रमास शाहू कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ. कुमार गुरव, डॉ. विद्यासागर गेडाम, विभागीय कृषी संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ. प्रवीण गजभिये, डॉ. योगेश वन, डॉ. महिंद्र यादव, मका संशोधन केंद्राचे डॉ. सुहास भिंगारदेवे, सुशांत महाडिक, धनाजी शिरगावे, सागर शेळके, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT