Crop
Crop  Agrowon
ॲग्रो विशेष

Sunburn Crop : कोवळी रोपे वाचविण्यासाठी शेतकरी सरसावला

Team Agrowon

Shahada News : शहरासह परिसरात गेल्या दहा दिवसांपासून सातत्याने उष्णतेचा पारा ४० डिग्री सेल्सिअसच्या वरती असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. तीव्र उष्णतेचा परिणाम नवीन लागवड केलेल्या पपई व केळी पिकाच्या रोपांवर होत असल्याने त्यांना वाचविण्यासाठी वेगवेगळे उपाय शेतकरी करीत आहेत.

पपईचा हंगाम जवळजवळ संपलेला असला तरी केळीचा हंगाम अद्याप सुरू आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांनी आता मशागतीची कामे सुरू केली आहेत. उन्हाळी कपाशी लागवड करण्याची लगबग सुरू आहे. त्यातच काही बागायतदार शेतकरी पपईची रोपे व केळीचे खोड लागवड करीत आहेत.

बऱ्याच शेतांमध्ये पपईची रोपे डोलायला लागली आहेत. मात्र सध्या त्या रोपांना उन्हापासून बचाव करण्यासाठी प्लॅस्टिकच्या कागदाचा उपयोग केला जात आहे. पाण्याचा अधूनमधून शिडकाव केला जातो. उन्हापासून बचाव करण्यासाठी प्राधान्य देत आहेत. एका बाजूला जमिनीत पाण्याची पातळी खोलवर गेली असताना पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे.

साधारणता प्रत्येक पपईच्या रोपाची किंमत १५ ते १६ रुपये आहे. सोलापूर भागातून काही शेतकरी रोपे मागतात. शहादा तालुक्यातदेखील आता मोठ्या प्रमाणात रोपे उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांना सोय झाली आहे. केळी पीक लागवडीसाठी तालुक्यातच शेतकऱ्यांकडे केळीचे खोड मिळत आहे. मात्र उष्णतेमुळे रोपांची कोवळी पाने पिवळी पडत आहेत. पूर्ण मे महिन्यात रोपांना वाचविण्यासाठी उपाययोजना करावी लागते.

दिवसभर उष्ण वारे वाहतात. उष्ण वाऱ्यांचा परिणाम पपई व केळी पिकांच्या पानावर होत आहे. रोपांना जास्तीत जास्त पाण्याचा ओलावा ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. शेतकरी उन्हापासून रोपांना वाचविण्यासाठी उपाय करीत आहेत. काही रोपे जळाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते.
दगडू पाटील, शेतकरी, जयनगर
केळी पिकाची कापणी सध्या सुरू आहे; परंतु अपेक्षित भाव मिळत नसल्याने उत्पन्नाचे आर्थिक गणित कोलमडले आहे. वाढत्या तापमानाची झळ फळांना बसत आहे. फळांना ऊन लागू नये म्हणून वेगवेगळ्या उपाययोजना सुरू आहेत.
ओंकार पाटील, केळी उत्पादक शेतकरी, ब्राह्मणपुरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Inputs : कृषी निविष्ठांची साठेबाजी रोखण्यासाठी आता भरारी पथके

APMC Election : सोलापूर, बार्शी बाजार समित्यांसाठी मागितली अर्हता तारीख

POCRA Subsidy : ‘पोकरा’च्या पहिल्या टप्प्यात बुलडाणा जिल्ह्यात २३० कोटींचे अनुदान

Water Scarcity : पाणी टंचाईचे संकट दिवसेंदिवस गडद

Water Crisis : मराठवाड्यातील धरणांनी तळ गाठला; विभागात फक्त ८.७४ टक्केच पाणीसाठा

SCROLL FOR NEXT