Buldhana News: खरीप हंगामातील प्रमुख पिकांपैकी एक असलेल्या मक्याचा हंगाम सध्या सुरू आहे. अनेक शेतकरी कापणी व मळणीच्या कामात व्यस्त असतानाच सततच्या पावसामुळे बुलडाणा तालुक्यातील मका पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. दीपावलीच्या काळात झालेल्या पावसाने कणसे अक्षरशः कुजून गेली असून, उत्पादन तर दूरच, केलेला खर्चसुद्धा परत मिळणे अवघड झाले आहे. विशेष म्हणजे चाऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे. .शासनाने आधी जाहीर केलेली ६० टक्के नुकसानभरपाई अपुरी असल्याने १०० टक्के नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी अवचितराव पालकर व परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. श्री. पालकर म्हणाले, की विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरील सातगाव म्हसला परिसरात १८ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान पावसाने धुमाकूळ घातला..Maize Crop Loss : बुलडाणा जिल्ह्यात पावसामुळे मक्याला फुटले कोंब.याच काळात शेतात कापलेला मका वाळवण्यासाठी ठेवला असताना सलग पावसामुळे पूर्णपणे कुजून गेला. शेतात पाणी साचल्याने जनावरांचा चारा सुद्धा नष्ट झाला. या भागात दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केल्या जातो. जनावरांना मक्याचा चारा हा पूरक ठरत असतो. अशा वेळी चारा खराब झालेला असल्याने संकट उभे राहिले आहे..मक्याच्या कणसांवर बुरशी चढून दाणे काळे पडत आहेत. मागील चोवीस तासांपासून पाऊस थांबला असला तरी नुकसान प्रचंड झाले आहे. शेतकरी शेतात पडून असलेले उरलेसुरले पीक वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहे..Wild Boars Crop Loss: अतिवृष्टीतून उरलेले भात पीक डुकरांकडून उद्ध्वस्त.या वर्षी दीड एकरांत मक्याची लागवड केली होती. एकरी सुमारे ३० हजार रुपये खर्च आला होता. नेहमीच्या हंगामात एकरी ३५ ते ४० क्विंटल उत्पादन मिळते; मात्र या वर्षी पूर्ण उत्पादन हातातून गेल्याने खर्चही निघाला नाही. या भागातील बहुतांश शेतकऱ्यांची हीच परिस्थिती आहे..त्यामुळे शासनाने तातडीने पंचनामे करून १०० टक्के नुकसानभरपाई द्यावी. सातत्याने झालेल्या पावसामुळे तालुक्यातील शेकडो एकरांवरील मका पिकावर बुरशी व कूज येऊन शेतकरी संकटात सापडले आहेत. शासनाने तत्काळ सर्वेक्षण करून पीकविमा व नैसर्गिक आपत्ती मदतीतून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी एकमुखी मागणी होत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.