Shaktipeeth Highway Agrowon
ॲग्रो विशेष

Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध सुरूच

Farmers Protest : या महामार्गाच्या, सरकारच्या धोरणांना आमचा ठाम विरोध आहे. नागपूर-रत्नागिरी महामार्ग आधीच अस्तित्वात असताना हा नवीन महामार्ग दुष्काळी तालुक्याच्या माथी लादण्यात येत आहे.

Team Agrowon

Solapur News : शक्तिपीठ महामार्गाचा विरोध करत शेतकरी संघर्ष समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. या महामार्गाची गरजच काय? हा महामार्ग त्वरित रद्द करावा असा स्पष्ट इशारा समितीचे अध्यक्ष ॲड. सचिन देशमुख यांनी दिला आहे.

हा महामार्ग रद्द व्हावा या मागणीसाठी मंगळवारी (ता. १) कोल्हापूर-सोलापूर मार्गावर अनकढाळ (ता. सांगोला) येथे रास्ता रोको आंदोलन होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. शक्तिपीठ महामार्ग रद्द व्हावा यासाठी सांगोल्यात ‘शेतकरी संघर्ष समिती’ स्थापन करण्यात आली. या समितीच्या वतीने आज सांगोल्यात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी समितीचे अध्यक्ष ॲड. सचिन देशमुख बोलत होते.

ॲड. देशमुख म्हणाले की, शेतकरी संघर्ष समिती ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही. सध्या शक्तिपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांच्या अंगावर लादला जात आहे. या महामार्गाच्या, सरकारच्या धोरणांना आमचा ठाम विरोध आहे. नागपूर-रत्नागिरी महामार्ग आधीच अस्तित्वात असताना हा नवीन महामार्ग दुष्काळी तालुक्याच्या माथी लादण्यात येत आहे.

दुष्काळी सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांची उपजीविका या शक्तिपीठ महामार्गामुळे धोक्यात येणार आहे, असे देशमुख यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, या भागात पाझर तलाव, नालाबांधणी यासाठी आधीच मोठ्या प्रमाणावर जमिनी घेतल्या आहेत. आता उत्पन्न देणाऱ्या शेतीच्या जमिनीही सरकार काढून घेत आहे. यामुळे भूमिहीन होणार आहोत.

भूसंपादनावर प्रश्नचिन्ह

शेतकऱ्यांनी सध्याच्या भूसंपादन प्रक्रियेला विरोध केला आहे. शासनाने अजूनही भूसंपादनाचा स्पष्ट दर जाहीर केलेला नाहीत. जे दर सांगितले जात आहेत, ते चुकीचे आणि दिशाभूल करणारे आहेत.

शेतकऱ्यांवर गुन्हे नको

मोजणीस आम्ही परवानगी देणार नाही. गुन्हे दाखल करून आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करू नये. हे आंदोलन केवळ आमचे नाही, आमच्या कुटुंबांचं आहे. आम्ही शेतकरी जात म्हणून एकत्र लढणार.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maratha Youth Scheme: कर्जाचा व्याज परतावा तातडीने द्या : तांबे

Farmer Cup 2026: फार्मर कप स्पर्धेत पुतळीच्या महिला समूहाचा सहभाग

HTBT Cotton Seeds: नागपुरात संशयास्पद एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Satara Rain News: पूर्वमोसमी पावसाचा साताऱ्याला मोठा फटका

Hingoli Water Scarcity: पाणीटंचाई निवारणार्थ २८ गावांमध्ये ३६ नवीन विंधन विहिरीना मंजुरी

SCROLL FOR NEXT