Shaktipeeth Highway Agrowon
ॲग्रो विशेष

Shaktipeeth Highway Protest : परळी तालुक्यात भूसंपादन प्रक्रियेला शेतकऱ्यांचा विरोध

Land Acquisition : कृषीदिनी राज्य सरकारने हा प्रस्तावित महामार्ग तत्काळ रद्द करावा. यासाठी परळी तालुक्यातील प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष बाधित शेतकऱ्यांनी तळेगाव याठिकाणी रास्तारोको करून या महामार्गास तीव्र विरोध केला होता.

Team Agrowon

Beed News : शक्तिपीठ महामार्गास शेतकऱ्यांचा कडाडून विरोध होत असून परळी तालुक्यातील प्रस्तावित गावातील संपादन प्रक्रियेला आलेल्या अधिकारी आणि पोलिसांना शेतकऱ्यांनी एकजूट होत तीव्र विरोध केला. शेतकऱ्यांच्या एकजुटीने तालुक्यात संपादन प्रक्रिया ठप्प झाली.

कृषीदिनी राज्य सरकारने हा प्रस्तावित महामार्ग तत्काळ रद्द करावा. यासाठी परळी तालुक्यातील प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष बाधित शेतकऱ्यांनी तळेगाव याठिकाणी रास्तारोको करून या महामार्गास तीव्र विरोध केला होता.

राज्यात शेतकऱ्यांना खोटी प्रलोभने, पोलिसी बळाची भीती दाखवत सीमांकन व संपादन करण्याच्या प्रयत्न शासन व प्रशासन करत असून शेतकरी आता या गोष्टीला बळी न पडता शक्तीपीठ महामार्ग विरोधात एकवटला आहे.

परळी तालुक्यातील ज्या गाव शिवारातून हा महामार्ग प्रस्तावित असून या महामार्गामुळे बाधित शेतकऱ्यांनी किसान सभेच्या नेतृत्वाखाली एकत्र येत तळेगाव या ठिकाणी कृषिदिनी रास्ता रोको करत शासनाचा निषेध करत या महामार्गास विरोध दर्शविला.

शनिवारी (ता. ५ ) या प्रस्तावित महामार्गाच्या संपादन प्रक्रिया कामी भोपळा, डाबी, कण्हेरवाडी तांडा या ठिकाणी आलेल्या अधिकारी आणि पोलिसांना शेतकऱ्यांनी एकजूट होत जमिनीची मोजदात करण्यास मज्जाव केला.

कोणत्याही परिस्थितीत वडिलोपार्जित कुटुंबाचे उपजीविकेचे साधन असलेली शेती या महामार्गास द्यायची नाही असा निर्धार बाधित शेतकऱ्यांनी कण्हेरवाडी तांडा या ठिकाणी झालेली बैठकीत केला.

या बैठकीस किसान सभेचे ॲड.अजय बुरांडे यांच्यासह व्यंकट ढाकणे, कॉ. प्रकाश चव्हाण, राहुल मुंडे, सुग्रीव फुंदे, तळेगाव येथील माणिक सोनवणे, गणेश सोनवणे, ओम मुंडे यांच्यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते. दरम्यान या मोजणी प्रसंगी उपस्थित असलेले उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी अरविंद लाटकर यांना शेतकऱ्यांनी विरोध करत परतावून लावले. लाटकर यांनी महामार्गाच्या जमीन संपादन प्रक्रियेला शेतकऱ्यांचा विरोध असल्याचा पंचनामा केल्याची माहिती ॲड. बुरांडे यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

Washim Drought Survey: वाशीम जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थितीची तातडीने पाहणी करा : दत्तात्रय भरणे

Rain Update: पश्चिम विदर्भात पावसाच्या सरी; खरीपाचे भवितव्य अधांतरी

El Nino Impacts: 'एल निनो'चं संकट; शेतकऱ्यांना मदत मिळणार, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वालांची माहिती

SCROLL FOR NEXT