PM Kisan Agrowon
ॲग्रो विशेष

PM Kisan : ‘किसान सन्मान’चे दीड कोटी रुपये परत

Agriculture Scheme : आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनातर्फे किसान सन्मान निधी योजना राबविण्यात येत आहे.

Team Agrowon

Ratnagiri News : आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनातर्फे किसान सन्मान निधी योजना राबविण्यात येत आहे. मात्र या योजनेचा लाभ शेतकऱ्यांसह आयकर भरणारे, तसेच जिल्ह्यातील काही शासकीय कर्मचारी घेत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील ५,४१५ सधन शेतकऱ्यांना पैसे परत करण्याची नोटीस बजावण्यात आली होती, त्यापैकी १ हजार १६४ जणांनी एक कोटी ४६ लाख ६० हजार रुपये परत केले आहेत. पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत चार महिन्यांनी दोन हजार रुपये मिळून वर्षभरात एकूण सहा हजार रुपये शेतकऱ्यांना पेन्शन देण्याची योजना केंद्र शासनाने २०१९ मध्ये सुरू केली.

जिल्ह्यात या योजनेचे २ लाख ६९ हजार ८३ लाभार्थी आहेत. प्रत्यक्ष शेतकऱ्यांसाठी असलेल्या या योजनेचा लाभ आयकर दाते व शासकीय कर्मचारीही घेत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले.

त्यामुळे शासनाने निधी परत करण्याची सूचना संबंधितांना नोटीस पाठवून केली होती. आयकर भरत असलेल्या ४८८४ लाभार्थ्यांकडून आतापर्यंत २६ हजार ३ हप्ते भरण्यात आले आहेत.

उर्वरित अपात्र शेतकऱ्यांकडील वसुलीबाबत पाठपुरावा सुरू आहे. मात्र, काही अपात्र ठरलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला असल्यास त्यांच्याकडील रक्कम कशी वसूल करावी, असा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. वसुलीसाठी प्रत्येक तहसील कार्यालयामार्फत नियोजन सुरू आहे.

जिल्ह्यातील एकूण लाभार्थी २, ६९,०८३ असून, ५ हजार ४१५ शेतकऱ्यांना पैसे परत करण्याची नोटीस मिळाली आहे.एक हजार १६४ शेतकऱ्यांनी केले पैसे परत केले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sustainable Economy: ध्येय सक्षम अन् शाश्‍वत अर्थव्यवस्थेचे

India Inflation: महेंगाई मार डालेगी

Rabi Season Crisis: बारामतीत खरिपासह रब्बी हंगाम धोक्यात

Agriculture PG Admission: कृषी पदव्युत्तरच्या तिसऱ्या फेरीवेळी गोंधळ

Fruit Processing Industry Development: फळप्रक्रिया उद्योगांसाठी लवकरच नवीन योजना : केंद्रीय कृषी सचिव आतिश चंद्रा

SCROLL FOR NEXT