आज आपण कापूस, कांदा, काकडी, गहू आणि कैरी बाजाराची माहिती घेणार आहोत.कापसात काहिशी सुधारणा देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून कापसाचे भाव स्थिरावल्यानंतर आज दरात काहिशी वाढ दिसून आली. सीसीआयनेही कापूस विक्रीचा भाव खंडीमागे २०० रुपयाने वाढवला होता. यामुळे बाजार समित्यांमध्येही कच्च्या कापसाचा भाव क्विंटलमागे ५० ते १०० रुपयांनी वाढला आहे. आज बाजारात कापूस प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार ४०० ते ८ हजारांच्या दरम्यान विकला गेला. कापसाचे भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .कांदा भाव दबावातचकांदा बाजारातील आवक सध्या चांगली सुरु आहे. तसेच अनेक भागात रब्बी कांद्याची काढणी सुरू आहे. काही भागात एप्रिलच्या मध्यापासून काढणीला वेग येणार आहे. त्यामुळे कांदा आवक पुन्हा सुधारण्याची शक्यता आहे. याचा दबाव दरावर राहू शकतो. सध्या बाजारात कांद्याला ८०० ते १२०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. कांद्याच्या आवकेमुळे दरावरील दबाव कायम राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Agrowon Podcast: मका भाव दबावातच; सोयाबीनची आवक मंदावली, कापूस आवक स्थिर, गहू आवक सुधारली तर तूर दर स्थिर.काकडीचा भाव टिकूनराज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून काकडीचा भाव टिकून आहे. बाजारातील काकडीची आवक सध्या मर्यादीत दिसत आहे. तर काकडीला उठाव चांगला आहे. याचा आधार दरालाही मिळत आहे. सध्या काकडीचा भाव प्रतिक्विंटल सरासरी १४०० ते १७०० रुपयांच्या दरम्यान आहे. वाढत्या उन्हासोबत काकडीला उठाव मिळत आहे. तर काकडी पिकाला वाढत्या उष्णतेचा फटका बसत आहे. त्यामुळे काकडीचा भाव टिकून राहू शकतो, असा अंदाज काकडी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Agrowon Podcast: टोमॅटोचा बाजार दबावात; सोयाबीन टिकून, कापूस स्थिर, कारली आवक वाढली तर गवारचे दर तेजीत.गव्हाची आवक वाढलीदेशातील बाजारात सध्या गव्हाची आवक वाढली आहे. याचा दरावर परिणाम दिसून येत आहे. यंदा देशात गव्हाची लागवड वाढली होती. तर गहू पिकासाठी पोषक हवामानही होते. त्यामुळे यंदा उत्पादन चांगले येण्याची शक्यता आहे. सध्या गव्हाला प्रतिक्विंटल सरासरी २२०० ते २६०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. गव्हाची काढणी देशभरात सुरु झालेली आहे. त्यामुळे बाजारात आवकेचा दबाव कायम राहण्याची शक्यता आहे. यामुळे गहू बाजारावरील दबावही कायम राहील, असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .कैरीला उठावराज्यातील बाजारात सध्या कैरीची आवक काहिशी सुधारली आहे. पण दुसरीकडे कैरीला उठावही चांगला आहे. वाढत्या उन्हामुळेही कैरीला मागणी येत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. सध्या कैरीला प्रतिक्विंटल सरासरी ३ हजार ते ४ हजारांच्या दरम्यान गुणवत्ता आणि वाणानुसार भाव मिळत आहे. कैरीची बाजारातील आवक पुढील काळात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कैरीच्या भावावर दबाव येऊ शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.