PM Kisan Farmers : PM किसानचा 16वा हप्ता जमा झाला नाही? शेतकऱ्यांनी कुठे तक्रार करावी?

PN Kisan Helpline : शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा १६ वा हप्ता जमा झाला नसेल तर त्यांनी तक्रार कशी आणि कुठे करावी?
PM Kisan
PM KisanAgrowon

PM Kisan Samman Nidhi : केंद्र सरकारकडून मागच्या ५ वर्षांपासून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला ६ हजार रुपये दिले जातात. वर्षाला ३ हप्त्यात २ हजार रुपयांची शेतकऱ्यांना मदत केली जाते. मागच्या ५ वर्षांत केंद्राकडून १६ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले. परंतु अद्यापही काही शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा १६ वा हप्ता मिळाला नाही. हा हप्ता मिळवण्यासाठी तक्रार कशी आणि कुठे कराल? याबाबत सविस्तर जाणून घ्या.

मागच्या महिन्याच्या अखेरीस २८ फेब्रुवारी २०२४ रोजी करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात PM किसान योजनेचा १६ वा हप्ता जमा झाला. परंतु अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम अद्यापही आलेली नाही. यावर केंद्राकडून तक्रारीसाठी काही पर्याय खुले केले आहेत. तुम्ही त्या नियम अटी पूर्ण केल्यास पुढच्या काही दिवसांत हा हप्ता खात्यावर जमा होऊ शकतो.

कुठे कराल तक्रार?

तुम्ही pmkisan-ict@gov.in किंवा pmkisan-funds@gov.in वर ई-मेलद्वारे तक्रार करु शकता. याचबरोबर पीएम किसान योजनेचा हेल्पलाइन नंबर 011-24300606 किंवा 155261 वर कॉल करू शकता किंवा पीएम किसानच्या टीमशी बोलण्यासाठी तुम्ही टोल फ्री 1800-115-526 वर संपर्क साधू शकता.

PM Kisan
PM Kisan Farmers : कोल्हापूर जिल्ह्यातील ४ लाख ५० हजार पीएम किसानचे होणार लाभार्थी

या कारणामुळे हप्ता थांबू शकतो

सरकारकडून पीएम किसान लाभार्थ्यांना ई-केवायसी अनिवार्य केली आहे. जी ई केवायसी नसेल तर हा हप्ता थांबू शकतो.

नोंदणी फॉर्ममध्ये कोणतीही चुकीची माहिती भरली असली, तरीही तुम्हाला योजनेची रक्कम मिळणार नाही.

लाभार्थ्याचे बँक खाते आधार कार्डशी लिंक केलेले नसले तरी हप्त्याची रक्कम अडकते.

जमिनीची पडताळणीही अनिवार्य आहे. शेतकऱ्याच्या जमिनीची पडताळणी न झाल्यास त्याला योजनेचा लाभ मिळत नाही.

चुकीची कागदपत्रे दिली असल्यास शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com