Akola News : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना घरचे बियाणे रास्त भावात मिळावेत या उद्देशाने अकोट, तेल्हारा येथे तालुकास्तरीय बियाणे महोत्सव घेण्यात आला. या दोन्ही ठिकाणी शेतकऱ्यांनी सहभागी होत बियाणे विक्रीसाठी आणले. शिवाय खरेदीसाठी शेतकऱ्यांचीही गर्दी उसळली होती.
अकोट येथे तालुका कृषी अधिकारी, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संयुक्त विद्यमानाने आयोजन करण्यात आले होते.
अकोट येथे बियाणे महोत्सवाचे उद्घाटन आमदार प्रकाश भारसाकाळे यांनी केले. या वेळी प्रमुख म्हणून बाजार समिती सभापती प्रशांत पाचडे, उपसभापती अतुल खोटरे, सहकार नेते रमेश हिंगणकर, तालुका कृषी अधिकारी तथा उपविभागीय कृषी अधिकारी सुशांत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
बियाणे महोत्सवात वैयक्तिक शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, खासगी कंपन्यांनी सहभाग घेतला. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला बाजारपेठेत अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने व उत्पादन खर्च प्रचंड वाढत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडत आहे.
दि बियाणे कंपन्यांची मक्तेदारी तोडण्यात यावी व शेतकऱ्यांचा पैसा शेतकऱ्यांकडे राहावा या उद्देशाने घरगुती बियाणे महोत्सवाचे आयोजन केले होते.
तेल्हारा येथे बियाणे विक्री
मंगळवारी (ता. ६) तेल्हारा झालेल्या बियाणे महोत्सवात शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या बियाण्यांची विक्री झाली. कृषी उत्पन्न बाजार समितीत संयुक्तपणे कृषी विभागाने या बियाणे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटक म्हणून आमदार प्रकाश भारसाकळे होते.
या वेळी जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता अढाऊ, बाजार समिती सभापती सुनील इंगळे, उपसभापती प्रदीप ढोले, पंचायत समिती सभापती आम्रपाली गवारगुरू, जयश्री घंघाळ, संजय हिवराळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाविषयी तालुका कृषी अधिकारी नरेंद्र राठोड यांनी माहिती दिली. मागील वर्षातील पीक स्पर्धा विजेते शेतकरी भारत थोरात व समाधान सातव यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन मंडळ कृषी अधिकारी रवींद्र माळी यांनी केले. आभार पंकज राऊत यांनी मानले.
बियाणे महोत्सवामुळे बाजारात जास्त दराने बियाणे खरेदी करण्यापेक्षा महोत्सवातून खरेदी केल्यामुळे शेतकऱ्यांचा पैसा शेतकऱ्यांकडेच राहिला. परिणामी, शेतकऱ्याचा फायदा झाला.सुशांत शिंदे, तालुका कृषी अधिकारी, अकोट
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.