Ajit Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Ajit Pawar Manifesto : सन्मान निधीत वाढ, कर्जमाफीचा वादा

Ajit Pawar : कृषी कर्जमाफी आणि शेतपिकाच्या एमएसपीवर २० टक्के अनुदान, ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी महिना १५०० रुपयांवरून २१०० रुपये असा घोषणांचा पाऊस पाडणारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा जाहीरनामा बुधवारी प्रकाशित करण्यात आला.

Team Agrowon

Mumbai News : शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजनेमध्ये तीन हजार रुपयांची वाढ, कृषी कर्जमाफी आणि शेतपिकाच्या एमएसपीवर २० टक्के अनुदान, ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी महिना १५०० रुपयांवरून २१०० रुपये असा घोषणांचा पाऊस पाडणारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा जाहीरनामा बुधवारी प्रकाशित करण्यात आला.

विधानसभा मतदार संघनिहाय निवडणूक जाहीरनामा (महाराष्ट्र घोषणापत्र) बुधवारी प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यामध्ये ११ नवीन आश्वासने समाविष्ट करण्यात आली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस लढवत असलेल्या सर्व मतदार संघात एकाचवेळी हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. बारामतीतून अजित पवार, गोंदियामधून खासदार प्रफ्फुल पटेल, नाशिकमधून छगन भुजबळ हे दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी होत, तर प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन जाहीरनामा प्रसिद्ध केला.

गुलाबी रंगात प्रकाशित केलेल्या जाहीरनाम्यात मतदारसंघनिहाय आश्वासने देण्यात आली आहेत. राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये, वीज बिलात ३० टक्के कपात, ग्रामीण भागात ४५ हजार पाणंद रस्त्यांच्या निर्मिती, वृद्धांच्या पेन्शनमध्ये १५०० रुपयांवरून २१०० रुपयांची वाढ, अंगणवाडी आणि आशा कर्मचाऱ्यांना महिन्याला १५ हजार रुपये वेतन आदी आश्वासने देण्यात आली आहे.

याशिवाय प्रशिक्षणाद्वारे एक लाख विद्यार्थ्यांना दहा हजार मासिक स्टायपेंड देण्यात येणार आहे. अंगणवाडी आणि आशा वर्कर कर्मचाऱ्यांना १५ हजार मासिक वेतन, सौर व अक्षय ऊर्जेला प्राधान्य देताना वीजबिल ३० टक्के कमी करण्यात येणार आहे. अत्यावश्यक वस्तूंच्या किमतीवर आळा अशी आश्वासनेही देण्यात आली आहेत.

लाडकी बहीण योजना, ४४ लाख शेतकऱ्यांना मोफत वीज, ५२ लाख कुटुंबांना तीन मोफत गॅस सिलिंडर, आर्थिक दुर्बल घटकांतील मुलींना मोफत शिक्षणाचा समावेश आदी जनतेच्या केंद्रस्थानी असलेल्या अनेक योजनांचा समावेश आहे. ३६ पानांच्या या मुखपृष्ठावर ‘महाराष्ट्रवादी घोषणापत्र’ असे छापण्यात आले आहे. शिवाय आपल्या मतदार संघातील विकासकामे आणि घोषणापत्रांच्या माहितीसाठी हेल्पलाइन नंबरही देण्यात आला.

पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव, स्टार प्रचारक सयाजी शिंदे, महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Satara Vidhansabha Election 2024 : सातारा जिल्ह्यात चुरशीने ७१.९५ टक्के मतदान

Kashmir Cold Weather : हिमवृष्टीने काश्‍मीरमध्ये थंडीचा कडाका वाढला

Memorandum of Understanding : दापोली येथील कृषी विद्यापीठाचा ऑस्ट्रेलियाच्या विद्यापीठाशी करार

Sugar Factory : वेळेत परवाने दिल्याने ३८ कारखान्यांची धुराडी पेटली

Farmer Producer Organizations : ‘एफपीओं’ना बीजोत्पादनात आणा; केंद्राच्या सूचना

SCROLL FOR NEXT