Ajit Pawar On NCP Manifesto : राष्ट्रवादीचा जाहीरनामा; एमएसपी, लॉजिस्टीक पार्कसह लाडकी बहीण योजनेवर अजित पवार यांचे आश्वास

Maharastra VIdhansabha Election : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित केला.
Ajit Pawar On NCP Manifesto
Ajit Pawar On NCP ManifestoAgrowon
Published on
Updated on

Pune News : उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी बुधवारी (ता.६) पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित करताना अजित पवार यांनी शेतकरी, महिला, युवक, रोजगार आणि जिल्ह्याच्या विकासाला महत्व दिलं आहे. आपल्या जाहीरनाम्यात शेतपिकांला अनुदान, लॉजिस्टीक पार्कच्या निर्मितीचा वादा अजित पवार यांनी केला आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली असून अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा केला. या जाहीरनाम्यात अजित पवार यांनी, धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजर रुपये देण्याचा वादा केला आहे.

Ajit Pawar On NCP Manifesto
Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीमुळे राज्याच्या महसुलात भर; फक्त उमेदवारांच्या अर्जातून ५५ लाख जमा

तर ग्रामीण भागात ४५ हजार पाणंद रस्त्यांच्या निर्मितीचा वादा करण्यात आला आहे. तसेच शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा आणि शेतपिकांच्या एमएसपीवर २० टक्के अनुदान देण्याबरोबरच लॉजिस्टीक पार्क उभारू असे आश्वासन अजित पवार यांनी दिले आहे.

Ajit Pawar On NCP Manifesto
Maharashtra Vidhansabha Election : अखेरच्या दिवशी सुमारे ११ हजार अर्ज; ४७ ठिकाणी सेना विरूद्ध सेना अशी लढत, महायुती २८२ तर मविआकडून २८७ उमेदवार

याचबरोबर अजित पवार यांनी आपल्या जाहीरनाम्यात वीज बिलात ३० टक्के कपात करून सौर व अक्षय ऊर्जेला प्राधान्य दिले जाईल. वृद्ध पेन्शन धारकांची पेन्शन १५०० वरून २१०० करू, दहा लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षणातून महिन्याला दहा हजार रुपये विद्यावेतन देण्यासह २५ लाख रोजगार निर्मिती करण्याचे आश्वासन दिले आहे.

लाडकी बहिण योजना समावेश करताना, १५०० ऐवजी २१०० रूपये देवू असे आश्वासन दिले आहे. तसेच महिला सुरक्षेसाठी २५ हजार महिलांचा पोलिस दलात समावेश केला जाईल. याचबरोबर जिल्ह्यात आधूनिक कॅन्सर सेंटर उभारू असे आश्वासन अजित पवार यांनी आपल्या जाहीरनाम्यातून दिले आहे. तसेच अजित पवार यांनी ९८६१७१७१७१ असा टोल फ्री नंबर सुरू केल्याची माहिती दिली असून आतापर्यंत २५ लाख कॉल आल्याचेही अजित पवार यांनी सांगितले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com