Farm Loan Waiver Agrowon
ॲग्रो विशेष

Beed Farmers Protest : कर्जमाफीकरिता किसान सभेची निदर्शने

Farmer Loan Waiver : बीड जिल्हा किसान सभेने वेळोवेळी कर्जमाफी, पीकविमा, हमीभाव, गायरान जमीन, शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासंबंधी प्रश्न लावून धरला.

Team Agrowon

Beed News : शेतकऱ्यांची कर्जमाफी करत तातडीने बळीराजाला मदत करावी यासाठी बीड जिल्हा किसान सभेने गुरुवारी (ता. १२) माजलगाव उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत बच्चू कडू यांच्या उपोषणाला पाठिंबा देत सरकारचा निषेध केला.

सरकारी धोरणांमुळे शेतकरी कायम अडचणीत आलेला असून तो कर्जबाजारी झाला आहे. या कर्जाच्या विळख्यातून त्याला बाहेर काढण्याचे आश्वासन राज्य सरकारमध्ये बसलेल्या सत्ताधारी पक्षांनी विधानसभा निवडणूक जाहीरनाम्यात दिले होते. मात्र निवडून येताच ‘आम्ही असे बोललोच नाही’, ‘बोललो असलो तरी आम्ही मुदत दिलेली नाही’ अशी सारवासारव सुरू केली आहे.

बीड जिल्हा किसान सभेने वेळोवेळी कर्जमाफी, पीकविमा, हमीभाव, गायरान जमीन, शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासंबंधी प्रश्न लावून धरला. खरिपाच्या तोंडावर अवकाळी पावसाने केलेले नुकसान, सत्ताधारी मंडळींची बळीराजा प्रति असलेली आस्था या सर्वच चीड आणणाऱ्या बाबींबर प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी या व इतर काही मुद्द्यांवर उपोषण सुरू केले आहे.

त्या उपोषणास अखिल भारतीय किसान सभेने पूर्ण पाठिंबा दिला आहे. राज्य सरकारमधील सत्ताधारी पक्षांनी निवडणुकीवेळी दिलेले वचन पाळून बच्चू कडू यांना उपोषणापासून परावृत्त करावे. असे झाले नाही तर बीड जिल्हा किसान सभा या प्रश्नांवर आपल्या पूर्ण ताकतीनिशी मोठे आंदोलन छडेल, असा इशारा या वेळी किसान सभेने दिला.

निदर्शने आंदोलनात किसान सभेचे ॲड. अजय बुरांडे, मुरलीधर नागरगोजे, दत्ता डाके, कृष्णा सोळंके, सुदाम शिंदे, शिवाजी कुरे, सुभाष डाके, अशोक डाके, कमेंट सुहास झोडगे, अशोक राठोड, बंडू गरड, चंद्रकांत घाटे, फारुख शेख आदींसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crab Farming : बंदीस्त खेकडा पालन करण्यासाठी प्रोत्साहन

Livestock Support: पशुपालकांना आता मिळणार शेतीसारख्या सवलती; ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना

Farmer Protest: ७/१२ कोरा करण्याच्या मागणीसाठी नागपूर-तुळजापूर महामार्ग ठप्प; शेतकऱ्यांचा न्यायासाठी लढा तीव्र

Urea Shortage : सांगलीत युरियाची टंचाई

Crop Competition : खरीप पीक स्पर्धेत सहभागी व्हा; कृषी विभागाचे आवाहन

SCROLL FOR NEXT