Shaktipeeth Highway Agrowon
ॲग्रो विशेष

Shaktipeeth Highway Protest: शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन!

Farmer Protest: शक्तिपीठ महामार्गामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान होणार असल्याने, वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.

माणिक रासवे : अॅग्रोवन वृत्तसेवा

Hingoli News: पवनार-पत्रादेवी (नागपूर-गोवा) शक्तिपीठ महामार्ग कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी शनिवारी (ता.८)बाधित शेतकऱ्यांनी वसमत परभणी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता-रोको आंदोलन केले.

शक्तिपीठ महामार्गासाठी हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील गिरगाव, पळसगाव, पिप्रा चौरे, गुंज रुंज, आसेगाव, टाकळगाव, राजापूर, बाभूळगाव, रेणकापूर, लोण बुद्रुक, हयातनगर, जवळा खुर्द या गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत. शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. तसेच बहुसंख्य शेतकरी हे भूमिहीन होणार आहेत.

वसमत तालुक्यातील शेती ही पूर्णपणे बागायती शेती असून शासनाने आखलेल्या या व्यावसायिक प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे कधीही न भरून होणारे नुकसान होत आहे. या महामार्गाचे काम स्थगित केल्याचे आश्वासन देऊनही महामार्गासाठी‌ भूसंपादनाचा आढावा घेतला जात आहे.

शेतकऱ्यांना बेसावध ठेवून या महामार्गाचे काम रेटण्याचा प्रयत्न निषेधार्ह आहे. त्यामुळे हा महामार्ग रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी शनिवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात अॅड. केतन सारंग, बाबूराव नवघरे, सुरेश पळवे, बापूराव ठोरे, सूरज मालेवार, उद्धव माखणे, भारत महाजन आदींसह परिसरातील अनेक शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CCI Cotton Procurement: ३.२५ लाख शेतकऱ्यांची कपास किसान अॅपवर नोंदणी; १५ ऑक्टोबर पासून कापसाची हमीभावावर खरेदी सुरु होणार

Peek Pahani: ई-पीक पाहणी केली नसेल तर एक आहे पर्याय, जाणून घ्या सहाय्यक स्तरावरील पीक पाहणीविषयी...

Crop Insurance Delay : विमा कंपनी, कृषिमंत्र्यांना हटवा

Soybean Crop Damage : सिन्नर तालुक्यात सोयाबीनला सर्वाधिक फटका

Sangli DCC Bank : सांगली जिल्हा बँकेच्या चौकशीतील १.९८ कोटी शासनाकडून वसूल

SCROLL FOR NEXT