Shaktipeeth Highway: ‘शक्तिपीठ महामार्गाचे रेखांकन थांबले! शेतकऱ्यांचा ठाम विरोध

Farmer Protest: शक्तिपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांना विश्वासात न घेता रेखांकनाची प्रक्रिया सुरू केल्याने शेतकऱ्यांचा संताप उफाळला. अचानक आलेल्या अधिकाऱ्यांना रोखत शेतकऱ्यांनी भूमी अधिग्रहणाला कडाडून विरोध केला.
Shaktipeeth Highway
Shaktipeeth HighwayAgrowon
Published on
Updated on

Nanded News: शासनाने शक्तिपीठ महामार्ग शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच राबविला जाईल, असे आश्‍वासन दिले होते. असे असताना कुठलीही लेखी पूर्वसूचना न देता अचानक रेखांकनासाठी खांब रोवण्यासाठी आलेल्या शासकीय अधिकारी व मोनार्क कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे काम अर्धापूर तालुक्यातील भोगाव येथील बाधित शेतकऱ्यांनी रोखले.

राज्य शासनाने जबरदस्ती लादलेल्या शक्तिपीठ महामार्गासाठी नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तसेच हदगाव तालुक्यांतील बागायती जमिनी संपादित होत आहेत. या भागात पूर्णा तसेच ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे पाणी शेतीला मिळते. अशा उपजाऊ जमिनी शक्तिपीठ महामार्गाला देण्यासाठी शेतकरी प्रखर विरोध करीत आहेत. परंतु सरकार या महामार्गाबाबत आग्रही का असा सवाल उपस्थित होत आहे.

Shaktipeeth Highway
ShaktiPeeth Highway : सत्ताधारी गटातील ४ आमदारांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध, सतेज पाटील यांची माहिती

या महामार्गाच्या रेखांकनासाठी नांदेड जिल्ह्यात येत आहेत. सध्या शेतकरी हळद व गहू काढण्याच्या तयारीत असताना कोणतीही पूर्वसूचना न देता रेखांकनाचे काम मिळालेले मोनार्क कंपनीचे प्रतिनिधी देशमुख व तलाठी वानखेडे यांनी भोगाव (ता. अर्धापूर) येथील शेतकऱ्यांना शेवटच्या क्षणी रेखांकनासाठी शेतात उपस्थित राहण्याची सूचना भ्रमणध्वनीवरून दिली. या बाबत कुठलीही अधिकृत सूचना शेतकऱ्यांपर्यंत आलेली नव्हती.

पीक काढणीच्या कामात व्यस्त असलेले शेतकरी अचानक आलेल्या सूचनेमुळे भांबावून गेले. शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय महामार्गाची प्रक्रिया राबविणार नाही, असे धोरण असताना ऐवढी घाई का प्रश्‍न शेतकरी उपस्थित करत आम्हाला या महामार्गासाठी जमीन द्यायची नाही अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली.

Shaktipeeth Highway
Shaktipeeth Highway Protest: ‘शक्तिपीठ’ रद्द करा, अन्यथा अधिवेशनावर गळफास मोर्चा

यामुळे शेतकऱ्यांना उद्रेक पाहता अधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे आपल्या भावना पोचविण्याचे आश्वासन देऊन रेखांकनासाठी आणलेल्या सामग्रीसह कार्यवाही थांबविली. या वेळी भोगाव येथील बाधित शेतकरी महंमद रियाज, शे.जावेद युसुफुद्दीन, म.जहीर, राजाराम वलबे, सतीश दवणे, संघर्ष गव्हाणे, हतीमोद्दिन शेख यांच्यासह भोगावमधील बाधित शेतकऱ्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

अन्यथा उद्रेक होण्याचा इशारा

शासनाने शेतकऱ्यांना विश्‍वासात घेतले नाही. तसेच कोणतीही पूर्वसूचना न देता असे धडक कार्यक्रम राबविण्याचा प्रयत्न केल्यास शेतकऱ्यांमधील उद्रेक गंभीर स्वरुपधारण करू शकेल, असा इशारा शक्तिपीठ महामार्गविरोधी कृती समितीचे समन्वयक सुभाष मोरलवार, गजानन, तिमेवार, सतीश कुलकर्णी, प्रमोद इंगोले, कचरू मुधळ, मारोती सोमवारे, सुभाष कदम, जळबा बुट्टे, सुभाष बुट्टे, खुर्दामोजे, पांडुरंग कदम आदींनी दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com