Nashik News : गेल्या विधानसभा निवडणुकीत सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा केल्या मात्र विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर सत्तेत आलेल्या सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी माजी कृषी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली रयत क्रांती संघटनेच्या वतीने येवला प्रांत कार्यालयासमोर शुक्रवारी (ता. ११) एकदिवसीय धरणे आंदोलन करत विविध मागण्या सरकारकडे करण्यात आले.
शेतकऱ्यांनी सकाळी ११ वाजता धरणे आंदोलनाला सुरुवात केली. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलक शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतजमिनीचे लिलाव त्वरित थांबवा अशा घोषणा यावेळी दिल्या. विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीरनाम्यात शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू, अशी आश्वासन देण्यात आले.
मतदारांनी भरभरून मतदानाचे दान दिले. मात्र सत्ता स्थापन झाल्यानंतर ही आश्वासन हवेत विरले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफी होणार नाही अशी घोषणा केली. त्यामुळे सदाभाऊ खोत सत्ताधाऱ्यांबरोबर घटक पक्ष म्हणून जरी असले शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर ठाम असल्याचे रयत क्रांती संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष वाल्मीक सांगळे यांनी बोलताना सांगितले.
...या आहेत प्रमुख मागण्या
शेतकऱ्यांचे संपूर्ण पीककर्ज माफ करा.
सोयाबीनला प्रति क्विंटल ६००० तर कांद्याला प्रति क्विंटल ४००० भाव द्या.
नाशिक जिल्हा बँक शेतकऱ्यांचे जमीन लिलाव त्वरित थांबवण्यात यावे.
वर्ष २०२४चे नुकसानभरपाई पीकविमा मिळावा.
सर्व शेती मालाची निर्यात बंदी न करता शेतीमाल निर्यात करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे.
कर्जमाफी केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही
सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एकदिवसीय धरणे आंदोलन केले आहे. आगामी काळात संघटनेच्या माध्यमातून आंदोलनाची दिशा ठरवून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्यभर आक्रमक अशा आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यात येईल, कर्जमाफी केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशारा यावेळी सांगळे यांनी दिला.
यावेळी तहसील कार्यालयाच्या नायब तहसीलदार पंकजा मगर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. संघटनेचे येवला तालुका प्रमुख नवनाथ वैद्य, निफाड तालुका प्रमुख संजय तासकर यासह ईश्वर सोनवणे, विलास भवर, कचरू सोनवणे, गोविंद करवर, दिनकर चव्हाण, तुकाराम गुळे, रवींद्र वानखेडे, भाऊसाहेब सोनवणे, नीलेश पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.