Onion Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Market : कांद्याचे पैसे थकविल्याने शेतकरी संतप्त

Onion Rate : खारीफाटा येथे खासगी बाजार समिती अस्तित्वात आल्यानंतर गेल्या पाच वर्षांपासून बाजार समितीमध्ये कांदा विक्रीसाठी शेतकऱ्यांची गर्दी आहे.

Team Agrowon

Nashik News : देवळा तालुक्यातील उमराणे येथील श्री रामेश्वर कृषी मार्केट या खासगी बाजार समितीमध्ये कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांचे गेल्या चार ते पाच महिन्यांपासून मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा संयम सुटला. शंभरहून अधिक शेतकरी मंगळवारी (ता.८) या बाजार समितीचे प्रवेशद्वारावर एकवटले होते. यावेळी ठिय्या देत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ‘कष्टाचे पैसे द्या’ असे शेतकऱ्यांची मागणी होती.

यावर बुधवार(ता.९) रोजी बाजार समितीकडून थकीत रकमेचे खरीप कांदा विक्रीचे धनादेश वाटप प्रक्रिया हाती घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. खारीफाटा येथे खासगी बाजार समिती अस्तित्वात आल्यानंतर गेल्या पाच वर्षांपासून बाजार समितीमध्ये कांदा विक्रीसाठी शेतकऱ्यांची गर्दी आहे.मात्र एका व्यापाऱ्याकडून कांदा खरेदी परिषद शेतकऱ्यांची देणे थकवल्याने शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला.

बाजार समितीने दुर्लक्ष केल्याने आम्हाला फटका बसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे होते. ही बाब बाजार समिती व्यवस्थापनाने गांभीर्याने घेतले आहे. बाजार समितीमधील व्यापाऱ्याने गेल्या काही महिन्यांपासून खरीप तसेच उन्हाळ कांद्याचे पैसे दिलेले नाहीत. "पैसे देतो" तोंडी शब्द देऊन आत्तापर्यंत वेळ मारून गेली. शेतकऱ्यांनी वेळोवेळी मागणी करूनही पैसे शेतकऱ्यांना वेळेवर भेटले नाहीत.

या प्रकारामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाल्याने शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला. बाजार समिती प्रशासनाने या प्रकरणात लक्ष घालून पैसे देण्याची मागणी आंदोलकांनी या वेळी केली.

बाजार समितीकडून धनादेश वाटप सुरू

डिसेंबर व जानेवारी महिन्यांत विक्री झालेल्या खरीप कांदा उत्पादक शेतकऱ्यांना धनादेश वाटप सुरू करण्यात आले आहे. काही अडचणी आहेत; मात्र त्यावर तोडगा काढण्यासाठी बाजार समिती काम करत आहे. शेतकऱ्यांना पैसे मिळतील. अर्धवट व चुकीच्या माहितीवर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये. शेतकऱ्यांच्या कष्टाला न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे श्री रामेश्वर कृषी मार्केटचे प्रमुख संचालक श्रीपाल ओस्तवाल यांनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना सांगितले.

धनादेश दिले जातील, मात्र पुढील तीन महिन्यांच्या तारखेच्या असतील, अशी पद्धत सुरू आहे. अगोदर विश्वासाने काम सुरू होते; मात्र एका व्यापाऱ्यांच्या आत्महत्यामुळे हे सर्व प्रकरण वाढलेले आहे. आमच्या कष्टाचे पैसे अडकले आहेत.
– अशोक गुंजाळ, शेतकरी, तिळवण, ता.सटाणा
खासगी बाजार समित्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होणार असेल तर ती कदापी सहन केली जाणार नाही. ज्या बाजार समित्यांमध्ये हे नियम पाळले जाणार नाहीत, त्या बाजार समित्या राज्य सरकारने कायमस्वरूपी बंद करून टाकाव्यात.
- भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Compensation: कृषिमंत्री भरणे पोहचले शेतकऱ्यांच्या बांधावर; नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची दिली ग्वाही

Marathwada Rain: तीन जिल्ह्यांतील १९८ मंडलांत पावसाची हजेरी

Nanded Heavy Rain: मुखेडला पाच नागरिकांसह ५२ जनांवरांचा मृत्यू

Agriculture Technology: विदर्भातील दुर्गम भागात कृषी तंत्रज्ञान विस्तारासाठी प्रयत्न

Agriculture Technology: भात रोप निर्मितीचे नवे तंत्र ठरतेय फायद्याचे...

SCROLL FOR NEXT