Shetkari Sanghtana Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Protest: १५ एप्रिलपासून शेतकरी संघटनेचे कर्जमुक्तीसाठी तीव्र आंदोलन!

Loan Waiver Demand: शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी, उत्पादन खर्चावर ५०% नफा द्यावा आणि शेतीमालावरील बंदी हटवावी या प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी संघटना १५ एप्रिलपासून राज्यभर तीव्र आंदोलन करणार आहेत.

Team Agrowon

Nimgaon Ketki News: शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी व शेतकरी आत्महत्यांचा कलंक पुसण्यासाठी १५ एप्रिलपासून शेतकरी संघटना राज्यामध्ये तीव्र आंदोलन करणार असल्याचे निवेदन पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह शाखेच्या तहसीलदांकडे शुक्रवारी क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेड शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव नांदखिले, शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष ॲड. पांडुरंग रायते, इंदापूर तालुकाध्यक्ष हरिदास पवार, पुणे जिल्हा युवक आघाडीचे अध्यक्ष दादा किरकत, सचिव शशिकांत शिर्के, पुणे जिल्हा उपाध्यक्ष गुलाबराव फलफले व त्यांच्या सहकाऱ्यांनी आंदोलनाचे निवेदन दिले.

या आंदोलनाबाबत शिवाजीराव नांदखिले म्हणाले, की एका दाण्याचे हजार दाणे करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने तो आत्महत्या करत आहे. शेतकरी सक्षम व्हायचा असेल तर डॉक्टर स्वामीनाथन समितीने शिफारस केल्याप्रमाणे उत्पादन खर्चाच्या पन्नास टक्के नफा त्याला मिळाला पाहिजे, परंतु कोणतेच सरकार याची अंमलबजावणी करत नाही.

१९ फेब्रुवारी ते १९ मार्च छत्रपती शिवाजी महाराज जयंती ते साहेबराव करपे कुटुंबीयांच्या स्मृतिदिनापर्यंत शेतकरी संघटनेने एक महिना शेतकरी कर्जमुक्ती, शेतीमालावरील निर्यात बंदी उठवावी, दोन साखर कारखान्यातील हवाई अंतराची अट रद्द करावी या मागण्यांसाठी जनजागरण करून १९ मार्च रोजी पुणे येथील कृषी आयुक्तालय येथे मोर्चा काढला होता.

या वेळी आमच्या मागण्या १४ एप्रिलपर्यंत मान्य न झाल्यास शेतकरी संघटना १५ एप्रिलपासून राज्यात तीव्र आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला होता. यानुसार आम्ही १५ एप्रिलपासून शेतीमालाची विक्री व वाहतूक बंद करणार आहोत. शहराकडे जाणारा भाजीपाला, साखर, दूध, फळे जाऊ देणार नाही. १४ एप्रिलपर्यंत सरकारने मागण्या मान्य कराव्यात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Cultivation : सततच्या पावसाने ऊस पीक धोक्यात

Crop Damage Survey : सांगली जिल्ह्यातील दीड हजार हेक्टरवरील पंचनामे पूर्ण

Water Project Storage : सातपुड्यातील प्रकल्प भरू लागले

Bajari Sowing : खानदेशात बाजरी पीक जोमात

Crop Insurance : शेतकऱ्यांना मिळणार १२७ कोटींची भरपाई

SCROLL FOR NEXT