Uddhav Tackeray : शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली, मात्र शोबाजी केली नाही; उद्धव ठाकरे यांचे महायुती सरकारवर जोरदार टीकास्त्र

Maharashtra Assembly Election 2024 : अमरावतीमध्ये शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी उद्धव ठाकरे यांनी प्रचार सभा घेतली. यावेळी त्यांनी महायुती सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.
Uddhav Tackeray
Uddhav ThackerayAgrowon
Published on
Updated on

Pune News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवणडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) निमित्ताने प्रचार सभा घेण्यास सुरूवात केली आहे. यावेळी त्यांनी अमरावतीमध्ये शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी प्रचार सभा गरूवारी (ता.७) घेतली. या सभेतून त्यांनी मविआचे सरकार असताना शेतकऱ्यांची कर्ज मुक्ती केली. पण बडेजाव किंवा शोबाजी केली नाही, असे टीकास्त्र महायुती सरकारवर सोडले आहे.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी, निवडणूक आयोगाने कितीही आक्षेप घ्यावा, आम्ही ते ऐकणार नसून जय भवानी, जय शिवाजी बोलणारच. आमचे सरकार आल्यावर प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराज यांचे मंदिर बांधणार अशी घोषणा केलीय.

Uddhav Tackeray
Uddhav Thackeray : सरकार इथले पाणी अदानींना विकतयं; कोल्हापुरच्या जाहीर सभेत उद्धव ठाकरेंचे महायुतीवर टीकास्त्र

तसेच आमचे सरकार कोरोना काळातही चांगले काम करत होते. मात्र ते पाडले. आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करत होतो. मी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. प्रोत्साहनपर अनुदान दिले. ती मी नाही तर आमच्या महाविकास आघाडीच्या सरकारने दिली.

शेतकऱ्यांसाठी आम्ही निर्णय घेतला. मात्र आम्ही असो किंवा मी यावरून कधीच मोठा शोबाजी केली नाही. मी जे ठरवलं होतं ते काही उपकार म्हणून नाही केलं तर ते माझं कर्तव्य म्हणून केल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. पण आज राज्यात हे 'तीन भाऊ, सगळे मिळून महाराष्ट्र खाऊ, अशा अविर्भावात वावारत आहेत, अशीही टीका उद्धव ठाकरेंनी महायुतीवर केली आहे.

Uddhav Tackeray
Political Parties Manifesto : महायुती, महाविकाससह वंचितच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना महत्व; पाहा कोणती आहेत आश्वासने?

यावेळी त्यांनी महायुतीच्या तिन्ही नेत्यांना पंतप्रधान मोदी म्हणतात तसे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करून दाखवला. मी सर्व उमेदवार मागे घेतो असे आव्हान देखील केले आहे. तसेच आपण राज्यात मुलींप्रमाणेच मुलांना देखील मोफत शिक्षण देणार असल्याचे, उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

तर उद्योगात आज महाराष्ट्र मागे गेला असून नागपूरमधील टाटा एअरबसचा प्रकल्प गुजरातमध्ये गेला. तो फडणवीसांना वाचवता आला नाही. राज्यातील सर्व काही गुजरातमध्ये जात असून ते आपण थांबवू. राज्यातील युवकांना दर महिन्याला चाळीस हजार रुपये देवू असेही आश्वासन उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com