Chia Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Chia Seed Cultivation : पारंपरिक पिकांऐवजी शेतकऱ्यांनी चीया सीडचा निवडला पर्याय

Chia Crop Sowing : वाशीम हा देशात आकांक्षित जिल्हा म्हणून गणल्या जातो. मागील काही महिन्यांपासून कृषी क्षेत्रात नवनवीन प्रयोगशीलता रुजवण्याचे काम सुरू झालेले आहे.

 गोपाल हागे

Washim News : या जिल्ह्यात रब्बी हंगामात गहू, हरभऱ्याशिवाय चिया सीड हे नवे पीक रुजत आहे. यंदाच्या हंगामात विक्रमी साडेतीन हजार हेक्टरपर्यंत लागवड पोचली असून हा तीन वर्षांतील उच्चांक आहे. जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार, कृषी विभागाचे मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांनी विश्‍वास दाखवत केलेला पीकबदल यातून हे यश मिळाले आहे.

वाशीम हा देशात आकांक्षित जिल्हा म्हणून गणल्या जातो. मागील काही महिन्यांपासून कृषी क्षेत्रात नवनवीन प्रयोगशीलता रुजवण्याचे काम सुरू झालेले आहे. जिल्हाधिकारी बुवनेश्‍वरी एस. यांनी नावीन्यपूर्ण उपक्रमांना जाणीवपूर्वक पाठबळ देण्याची भूमिका स्वीकारली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शहा यांनी जिल्हाभरात सेंद्रिय पद्धतीने चियासीड उत्पादनासाठी शेतकरी कंपन्या, गटांना वारंवार प्रोत्साहित केले.

त्यानंतरच हे सेंद्रिय उत्पादन खासगी खरेदीदाराच्या माध्यमातून १४ हजार रुपये प्रतिक्विंटल दराने विक्रीचा करारही झाला. मागील दोन हंगामात या दराने खरेदी-विक्री झाली. यंदाही ही पद्धत कायम आहे. गव्हाच्या पिकाला लागणाऱ्या पाण्यापेक्षा कमी पाण्यात येणारे, एकरी चार ते सहा क्विंटलपर्यंत उत्पादकता, वन्यप्राण्यांचा कुठलाही त्रास नसलेले हे पीक म्हणून परिचित झाले आहे. आत्माच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक, प्रशिक्षण, शेतीशाळा घेऊन पिकाबाबत जनजागृती केली जात आहे.

चियासीडचा आलेख वाढता

वाशीम जिल्ह्यात चिया सीड हे नवे पीक चांगलेच रूजत आहे. सन २०२२-२३ च्या हंगामात जिल्ह्यात या पिकाचे आगमन झाले. पहिल्या वर्षी साधारणपणे १६२ हेक्टरवर लागवड झाली होती. सन २०२३-२४ मध्ये हीच लागवड ८९८ हेक्टरवर पोचली. यंदाच्या हंगामात विक्रमी अशी ३४०० हेक्टरपर्यंत ही लागवड झाली आहे. शेतकऱ्यांमध्ये आलेली जागरूकता, बाजारात मिळणारा दर, सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या चियाला १४ हजारांचा दर मिळेल अशा पद्धतीचा करार, या सर्वच बाबी हे पीक विस्तारात महत्त्वाच्या ठरल्या आहेत.

मार्केटिंगला पाठबळ

चिया सीडला पूर्वी इंदूर हेच मार्केट होते. तेथे नेऊन विक्री करण्याशिवाय पर्याय नव्हता. आता क्षेत्र वाढल्याने व माल उपलब्ध होत असल्याने खरेदीदार थेट संपर्क साधून खरेदी करीत आहेत. आजवर सरासरी दर १३ हजारांपर्यंत मिळालेला आहे. तसेच शेतकरी कंपन्या व खरेदीदारांमध्ये खरेदी करारही करण्यात आला.

सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला चिया १४ हजार रुपये दराने घेण्याबाबतचा करार आहे. आजवर साडेचार हजार क्विंटल चिया विक्री झाला. या माध्यमातून सुमारे सहा कोटींपेक्षा अधिक पैसा या पिकाने जिल्ह्याला दिल्याचा दावा होतो. तसेच यापुढील काळात स्थानिक पातळीवर खरेदी-विक्री व्यवहार सुरू करण्यासाठी बाजार समित्यांकडूनही पुढाकार घेतल्या जात आहे.

कापणीपश्‍च्यात प्रतवारी

चिया सीड हे नवे पीक होते. त्याची काढणी, मळणी, प्रतवारीबाबत फारशी माहिती नव्हती. मागील दोन हंगामात अनुभव मिळाल्याने शेतकरी आता पिकाची कापणी करून यंत्राद्वारे मळणी करतात. तसेच प्रतवारीही यंत्राच्या साह्याने करून माल विकत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahua Processing Business : गोडवा मोहफुलांच्या लाडवांचा

Beekeeping Business : तरुण उद्योजक मित्रांची अमृत मध निर्मिती

Land Circular: भोगवटादार वर्ग-२ जमिनींसाठी परिपत्रक

Soil and Water Engineering: मृदा, जलसंवर्धनामध्ये अभियांत्रिकी तंत्राचा वापर

Farmer Injustice: शेतकरी नावडे सर्वांना

SCROLL FOR NEXT