Akola Lok Sabha Elections Agrowon
ॲग्रो विशेष

Akola Lok Sabha Elections : अकोल्यात रेल्वेच्या कवडीमोल मोबदल्यावर शेतकरी संतप्त; मतदानावर बहिष्काराचा इशारा

Maharashtra Lok Sabha Election 2024 : अकोला जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहेत. रेल्वे भूमी अधिग्रहणात कवडीमोल मोबदल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी हा इशारा दिला आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : सध्या राज्यासह देशात लोकसभा निवडणुकीचा धुरळा उडण्यास सुरूवात झाली आहे. यादरम्यान अनेक ठिकाणी मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा सर्वसामान्यांसह शेतकरी देत आहेत. दरम्यान अकोल्यात देखील आता शेतकऱ्यांनी बहिष्काराचे अस्त्र काढले असून शेतकऱ्यांनी रेल्वे भूमी अधिग्रहणात मिळालेल्या कवडीमोल मोबदल्यामुळे संताप व्यक्त केला आहे. तसेच योग्य मोबदला न दिल्यास लोकसभा आणि होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घालू, असा इशारा दिला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, अकोला (Akola) जिल्ह्यातील तेल्हारा आणि अकोट तालुक्यातून हिवरखेड खांडवा ब्रॉडगेज रेल्वे लाईनच्या कामासाठी रेल्वेने जमीन अधिग्रहण केली होती. मात्र त्याचा मोबदला कवडीमोल भावाने देण्यात आला. यामुळे शेतकऱ्यांतील असंतोष उफाळला असून रेल्वे प्रशासन अन्याय करत असल्याची भावना व्यक्त केली आहे.

तसेच भू संपादन अधिनियम २०१३ च्या तरतूदींचे उल्लंघन अधिकाऱ्यांनी केले असून मनमानी कारभार करून भूसंपादन केले जात आहे. तसेच येथे जमीन बायाती असताना भूसंपादन अधिकाऱ्यांनी जिरायतीप्रमाणे मूल्यांकन केल्याचा आरोप देखील शेतकऱ्यांनी केला आहे.

तर याआधी राज्यातील अमरावती विभागातील पुसद, यवतमाळ, वर्धा, आणि नांदेड येथील रेल्वे प्रकल्पाकरिता भूमी अधिग्रहण करण्यात आले होते. जे बाजार मूल्याप्रमाणे करण्यात आले होते. याप्रमाणे रेल्वेने तेल्हारा आणि अकोट तालुक्यातून हिवरखेड खांडवा ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्पातील भूमी अधिग्रहणाला दर द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

तसेच रेल्वे प्रशासनाने समोर आणलेल्या बाबींचा विचार करून शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला द्यावा. अन्यथा लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’विरोधात ‘चक्का जाम’

Sugarcane Productivity : ‘हेक्टरी १२५ टन ऊस उत्पादकता वाढ’ अभियानास कोल्हापुरात प्रारंभ

Agriculture Irrigation : गतवर्षीच्या तुलनेत सिंचनासाठी १६ टीएमसीने उपसा कमी

SCROLL FOR NEXT