Nashik News Agrowon
ॲग्रो विशेष

Nashik News : नाशिकच्या शेतकऱ्यांनी गुजरातमध्ये गिरवले मूल्यसाखळी विकासाचे धडे

२ मार्च ते ८ मार्च या ७ दिवसाच्या कालावधीमध्ये २६ शेतकरी उत्पादक कंपनीच्या एकूण १३० शेतकरी प्रतिनिधींनी दौऱ्यात सहभाग नोंदविला.

Team Agrowon

Nashik Update : कृषी विभाग व जागतिक बँक अर्थ सहाय्यित बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प अंतर्गत निवड झालेल्या जिल्ह्यातील २६ शेतकरी उत्पादक कंपन्यांची निवड करण्यात आलेली आहे.

मूल्यसाखळी विकासासाठी शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक व भागधारक शेतकऱ्यांना विविध नावीन्यपूर्ण कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र व इतर संस्था यांनी केलेल्या संशोधनाचा, विक्री व्यवस्था, प्रक्रिया उद्योगांचा अभ्यास व्हावा यासाठी विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली गुजरात अभ्यासदौरा आयोजित करण्यात आला होता. शेतकऱ्यांनी या दौऱ्यात मूल्यसाखळी विकासाचे धडे गिरवले.

२ मार्च ते ८ मार्च या ७ दिवसाच्या कालावधीमध्ये २६ शेतकरी उत्पादक कंपनीच्या एकूण १३० शेतकरी प्रतिनिधींनी दौऱ्यात सहभाग नोंदविला.

गुजरात राज्यातील आनंद कृषी विद्यापीठ येथे मूल्यसाखळी विकासाचे प्रशिक्षण, अमूल डेअरी येथे प्रकल्प व्यवस्थापन, कृषी उत्पन्न बाजार समिती भावनगर येथे बाजार परीक्षण, व बाजार समिती येथे कांदा पिकावर बाजार समितीचे सभापती घनश्याम भाई पटेल व आमदार श्री गोइल यांच्या उपस्थितीत कांदा पिकावर चर्चासत्र घेण्यात आले.

जुनागढ कृषी विद्यापीठ येथे मूल्य साखळी विकासाचे प्रशिक्षण, नवसारी कृषी विद्यापीठ येथे भात संशोधन केंद्र, भुईमूग संशोधन संचालनालय जुनागढ, प्रक्रिया उद्योगासाठी लागणारे मशिन विश्वकर्मा मशनरी राजकोट, फळ प्रक्रिया उद्योग गनदेवी, स्थानिक उपक्रमशील शेतकरी यांच्या प्रक्षेत्र भेटी या ७ दिवसामध्ये आयोजित करण्यात आलेल्या होत्या. दौऱ्यात संजय वाघ, अमित भोसले यांनी दौऱ्याचे यशस्वी नियोजन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CM Women Employment Scheme: बिहार सरकारच्या ‘मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेतून महिलांना मिळणार १० हजार रुपये

Crop Insurance : पीकविम्याची थकित १६० कोटी भरपाई वाटप करा

Cashew Crop Insurance : विमा परताव्याची रत्नागिरीत ३६ हजार बागायतदारांना प्रतीक्षा

Illegal Fishing : अवैध मासेमारीला चालना मिळणार

Kadba Kutti Machine Scheme: शेतकऱ्यांना सरकारकडून कडबा कुट्टी मशीनवर मिळणार ५० टक्के अनुदान

SCROLL FOR NEXT