Tehsildar and Farmer Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Issue : पीकविमा अग्रिमसाठी जामगाव मंडलातील शेतकरी आक्रमक

Election Boycott : रखडलेला पीक विमा मिळावा यासाठी शेतकरी आक्रमक झाले असून मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : पीक विम्याच्या २५ टक्के अग्रिम पासून ९ महिन्यांपासून वंचित असलेल्या गंगापूर तालुक्यातील जामगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी गंगापूर तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, पीकविमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना तहसीलदारांच्या दालनात बुधवारी (ता. ८) दुपारी घेराव घातला. रखडलेला पीक विमा मिळावा यासाठी शेतकरी आक्रमक झाले असून मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा त्यांनी दिला.

जामगाव मंडलातील पीकविमा मिळाला नाही म्हणून शेतकऱ्यांनी तहसीलदार, कृषी अधिकारी, पीकविमा अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदन दिले. आंदोलने करूनही आजपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत.

शेतकऱ्यांच्या संतापाचा विचार करून शासनाने त्वरित निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करावेत, अन्यथा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा शेतकऱ्‍यांनी दिला होता. बुधवारी शेतकऱ्यांनी अप्पर तहसीलदार आकाश दहार्डे, तालुका कृषी अधिकारी बापूराव जायभाये, नायब तहसीलदार गौरव खैरनार, कंपनीचे विभागीय व्यवस्थापक हेमंत शिंदे, तालुका समन्वयक प्रवीण जगताप आदींवर प्रश्नांची सरबत्ती केली.

पीक विमा धारक शेतकऱ्यांच्या याद्या मिळतील, त्या शेतकऱ्यांना कळविल्या जातील, त्यांची नावे अपलोड करून शुक्रवारपर्यंत (ता.१०) शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणे सुरू होईल, असे विमा कंपनीने कळविले असल्याचे दहारडे यांनी सांगितले. तसे न झाल्यास विमा कंपनीला ब्लॅक लिस्ट करण्याची पावले उचलले जातील, असेही त्यांनी सांगितले. अप्पर तहसीलदार यांनी यावेळी स्पष्ट केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabinet Meeting : अतिवृष्टीग्रस्तांसाठी ११ हजार कोटी रुपयांच्या वितरणाचा निर्णय; मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती

Sugarcane Price Protest: कोल्हापुरात ऊसदर आंदोलन पेटले, अपेक्षित दर नाही अन् काटामारी, यड्रावकरांच्या कारखान्यांची ऊस वाहतूक रोखली

Vasantdada Sugar Institute: 'व्हीएसआय'ला दिल्या जाणाऱ्या अनुदानाची चौकशी होणार

Spirulina : आरोग्यदायी स्पिरुलिना

Montha Cyclone: मोंथा चक्रीवादळाची तीव्रता वाढली; आज सायंकाळी जमिनीवर धडकणार, जोरदार पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT