Solapur News: पशुखाद्यांच्या किमतीत झालेली भरमसाट वाढ आणि चाराटंचाई यामुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून दूध खरेदी दरात वाढ न झाल्याने तो दुहेरी संकटात सापडला आहे. उत्पादन खर्च वाढूनही उत्पन्न घटल्याने दूध उत्पादक शेतकऱ्याची अवस्था आर्थिक चक्रव्यूहात अडकल्यासारखी झाली आहे..राज्याचे दूध संकलन प्रति दिन सुमारे दोन ते सव्वादोन कोटी लिटरपर्यंत होते. त्यात सर्वाधिक जवळपास ७० टक्के गाईच्या दुधाचा समावेश आहे. सध्या गाईच्या दुधाला प्रति लिटर ३६ ते ३७ रुपये दर मिळत आहे. तर म्हशीच्या दुधाला प्रति लिटर ५० ते ५२ रुपये मिळत आहेत. साधारण सहा महिन्यांपूर्वी १ जूनला गाईच्या दुधाचा दर १ रुपयांनी आणि म्हशीच्या दूधदरात २ रुपयांनी कपात करण्यात आली. तेव्हापासून आजपर्यंत दूधदरात एक पैशाचीही वाढ झालेली नाही..Milk Processing : प्रक्रियेसाठी दुधाची गुणवत्ता तपासणी.पण सहकारी आणि खासगी दूध संघ मात्र मूग गिळून गप्प आहेत. राज्यातील एकूण दूध उत्पादनांपैकी दूध पावडर, बटर यासाठी ३५ ते ४० टक्के दूध वापरले जाते, तर उर्वरित ६०-६५ टक्क्यांपर्यंतचे दूध पिशव्यांमधून विकले जाते, सध्या प्रक्रियायुक्त पदार्थांचे दर मात्र चांगलेच तेजीत आहेत. उलट दुधाची कमतरता, या नावाखाली त्यांचे दर मात्र भरमसाट वाढलेले आहेत, ही वस्तुस्थिती आहे..दूध उत्पादनात १० ते २० टक्क्यांची घटदूध हंगामाचा सध्या पुष्टकाळ असला, तरी वाढती थंडी, चाराटंचाई या कारणांमुळे राज्याच्या एकूण दूध उत्पादनात जवळपास १० ते २० टक्क्यांनी घट झाली आहे. १० लिटर दूध देणारी गाय आता ७-८ लिटरवर आली आहे. त्यामुळे एकीकडे दुधाचे अपेक्षित उत्पादन नाही, तर दुसरीकडे दुधाला दर नाही, या दोन्हीत मात्र शेतकऱ्यांची पुरती कोंडी झाली आहे..Milk Processing: पोषणमूल्य जपण्यासाठी दुधावर प्रक्रिया.जनावरांच्या किमतीत मोठी घसरणदूध व्यवसाय तोट्यात जात असल्याने बाजारात गाई-म्हशींच्या किमती निम्म्याने घटल्या आहेत. लाख रुपयांची जर्सी गाय आता ५० ते ६० हजार रुपयांत मिळत आहे, तर लाख रुपयांच्या घरातील म्हैस ६० ते ७० हजारांवर आली आहे. दुधाला दरच नाही, तर जनावरे घेऊन काय करणार, असा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे नवीन जनावरे खरेदी करण्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. उलट जनावरे विक्रीकडे त्यांचा सर्वाधिक कल वाढतो आहे..पशुखाद्याचे भाव तेजीतप्रति ५० किलोच्या शेंगापेंडीचे पोते आधी १७०० ते १८०० रुपयांपर्यंत मिळत होते, ते आता २२०० ते २५०० रुपयांवर पोहोचले आहेत. ५० किलोचे गहू भुश्शाचे पोते पूर्वी १००० रुपयापर्यंत होते, ते आता १४०० रुपयांवर आहे. सुग्रासचे ५० किलोचे पोते १२०० रुपयांपर्यंत मिळत होते, तेही आता १८०० रुपयांवर आले आहे. २०० ते ४०० रुपयांच्या फरकाने पशुखाद्यांच्या दरात वाढ झाली आहे..सध्या जनावरांना हिरवा चारा म्हणून मका किंवा कडवळ उपलब्ध नाही, केवळ उसाचे वाढे चारा म्हणून दिला जातो आहे. परिणामी तेही सारखे देणे चुकीचे आहे. पशुखाद्याचे दर वाढलेले आहेत. सहा महिन्यांपासून दूध खरेदीदरात कोणतीच वाढ झालेली नाही. त्यामुळे अडचण झाली आहे. कोणी बोलायलाच तयार नाही, करणार काय.शंकर साठे, शेतकरी, दूध डेअरी चालक, बीबीदारफळ, उत्तर सोलापूर.माझ्याकडे २५ गाई आहेत. रोजचे ३०० लिटर दूध डेअरीला जाते, पण दरच नाही, खर्च आवाक्याबाहेर चालला आहे. पशुखाद्याचे दर वाढलेले आहेत, हिरवा चाराही मिळत नाही. त्यामुळे सर्वबाजूंनी कोंडी झाली आहे. धड सोडताही येत नाही अन् पळताही येईना, अशी अवस्था झाली आहे.महेंद्र बाजारे, दूध उत्पादक, महूद बुद्रुक, ता. सांगोला.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.