Banana crop insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Crop Insurance : केळीच्या नुकसानीचे परतावे अनेक विमाधारकांना अप्राप्त

Crop Insurance Compensation : एकाच वेळी सर्व पात्र केळी विमाधारकांना २०२२-२३ च्या हंगामातील केळीच्या वादळात नुकसानीची भरपाई किंवा परतावे द्यायला हवे होते.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : जिल्ह्यात २०२२-२३ च्या हंगामात फळ पीकविमा योजनेत सहभागी झालेल्या केळी विमाधारकांना केळीच्या वादळात नुकसानीचे परतावे किंवा नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाल्याचे संदेश सोमवारी (ता. १०) पाठविण्यात आले. परंतु हे संदेश फसवे असून, अनेक केळी विमाधारक या परताव्यांच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसत आहे.

भारतीय कृषी विमा कंपनी (एआयसी) ही केंद्र शासन पुरस्कृत संस्था फळ पीकविमा योजनेचे कामकाज जिल्ह्यात करीत आहे. या कंपनीकडून केळीचे २०२२-२३ च्या हंगामात वादळात नुकसानीचे परतावे प्राप्त झाल्याचे किंवा शेतकऱ्यांना दिल्याचे कोणतेही पत्र जारी करण्यात आलेले नाही. काही स्वयंघोषित कार्यकर्ते व शेतकऱ्यांचे कथाकथीत हितचिंतकांनी परस्पर यासंबंधीचे व्हिडिओ, माहिती विविध समाज माध्यमांत सोमवारी जारी केली.

यात काही केळी विमाधारकांनाच हे परतावे सोमवारी मिळाल्याचे दिसून आले. यातही काही विशिष्ट भागातील शेतकऱ्यांना हे परतावे देताना झुकते माप दिल्याची टीकाही शेतकरी किंवा अन्य केळी विमाधारक करीत आहेत. एकाच वेळी सर्व पात्र केळी विमाधारकांना २०२२-२३ च्या हंगामातील केळीच्या वादळात नुकसानीची भरपाई किंवा परतावे द्यायला हवे होते. एका भागाला एक न्याय व दुसऱ्या भागावर अन्याय असा प्रकार करू नका, असेही शेतकऱ्यांनी म्हटले आहे.

केळीच्या वादळात नुकसानीसंबंधी २०२२-२३ च्या हंगामात फळ पीकविमा योजनेत सहभागी झालेल्या ३५ हजार ८०३ केळी विमाधारकांना १३० कोटी नऊ लाख ८६ हजार ३२९ रुपये एकूण निधीचे वितरण थेट संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात केल्याचे संदेश समाज माध्यमांत काहींनी फिरविले. तर काहींनी २६ हजार ८४० केळी विमाधारकांना केळीची वादळात नुकसानीची भरपाई जमा होण्यास सोमवारी सुरुवात झाल्याचे संदेश पसरविले आहेत.

यामुळे केळी विमाधारकांत संभ्रम आहे. यावर विमा कंपनी, कृषी विभागाने स्पष्टीकरण द्यावे. शेतकऱ्यांची फसवणूक करू नये व कुठलीही दिशाभूल करू नये, अशी मागणीदेखील करण्यात आली आहे. कारण अनेक केळी विमाधारकांना २०२२-२३ च्या हंगामातील केळीची वादळात नुकसानीची परतावा रक्कम किंवा नुकसान भरपाई मंगळवारपर्यंत (ता. ११) मिळालेली नव्हती. ही नुकसान भरपाई या आठवड्यात सर्व पात्र केळी विमाधारकांना मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paus Andaj: ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता; राज्यात पुढील ५ दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता

Cloudy Weather : ढगाळ वातावरण कायम; पिकांना फटका

Soybean Rate : सोयाबीन उत्पादकांची व्यापाऱ्यांकडून लूट

Sugarcane Worker Support: ऊसतोड कामगारांना तात्काळ आर्थिक मदत द्या: उपसभापती गोऱ्हेंची मागणी

Bacchu Kadu: कर्जाचा हप्ता बँकेत जात नाही; तोपर्यंत आंदोलन संपणार नाही, बच्चू कडूंचा सरकारला इशारा

SCROLL FOR NEXT