Banana Crop Insurance : केळी उत्पादकांना पीकविमा परतावा मिळणार

Crop Insurance : एप्रिल व मे महिन्यात उष्णतेने कहर केला. एप्रिलमध्ये अनेक दिवस ४२ अंश सेल्सिअसवर तापमान होते.
Banana crop insurance
Banana crop insuranceAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : जिल्ह्यात अतिउष्णतेत केळी पिकाला मोठा फटका बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, केळी विमाधारक शेतकऱ्यांना अतिउष्णतेमुळे झालेल्या नुकसानीपोटी ४३ हजार ५०० रुपये प्रतिहेक्टर यानुसार भरपाई किंवा परतावा मिळणार आहे.

एप्रिल व मे महिन्यात उष्णतेने कहर केला. एप्रिलमध्ये अनेक दिवस ४२ अंश सेल्सिअसवर तापमान होते. तर मे महिन्यातही अनेक दिवस ४५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान होते. यात फळ पीकविमा योजनेतून २०२३-२४ च्या हंगामात केळी पिकासंबंधी विमा संरक्षण घेतलेल्या विमाधारक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ४३ हजार ५०० रुपये एवढी भरपाई किंवा परतावा मिळणार आहे. जिल्ह्यातील ५१ महसूल मंडलांतील केळी विमाधारक शेतकरी या परताव्यासाठी पात्र ठरले आहेत.

Banana crop insurance
Crop Insurance : विमा कंपनी कार्यालयांत शेतकऱ्यांना प्रतिसाद मिळेना

फळ पीकविमा योजनेतून केळी पिकासंबंधी मे महिन्यात सलग पाच दिवस ४५ अंश सेल्सिअस किंवा यापेक्षा अधिक तापमान राहिल्यास नुकसान भरपाई देय आहे. जिल्ह्यात मे महिन्यात ५१ महसूल मंडलांत कमाल तापमान सलग पाच दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस ४५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक नोंदविण्यात आले आहे. हे परतावे विमा संरक्षण कालावधी संपल्यानंतर ४५ दिवसांत मिळणे अपेक्षित आहे. विमा संरक्षण कालावधी ३१ जुलै रोजी संपणार आहे.

Banana crop insurance
Crop Insurance : ‘बारा टक्के व्याजासह केळी पीकविमाधारकांना परतावे द्या’

या मंडलांतील शेतकऱ्यांना मिळणार लाभ

जळगाव तालुका ः पिंप्राळा, भोकर, नशिराबाद, आसोदा, म्हसावद.

पाचोरा ः कुऱ्हाड बुद्रूक, पाचोरा.

अमळनेर ः अमळनेर, भरवस, मारवड, नगाव, अमळगाव, पातोंडा, शिरूड, वावडे.

भडगाव ः भडगाव, कोळगाव.

चाळीसगाव ः खडकीबुद्रूक, शिरसगाव.

धरणगाव ः धरणगाव, पाळधी, पिंप्री, साळवा, सोनवद.

एरंडोल ः एरंडोल, कासोदा, रिंगणगाव, उत्राण.

पारोळा ः बहादरपूर, शेळावे, तामसवाडी, पारोळा.

भुसावळ ः वरणगाव.

चोपडा ः गोरगावले, अडावद, चहार्डी, चोपडा, हातेड, लासूर.

जामनेर ः जामनेर, नेरी, शेंदूर्णी.

मुक्ताईनगर ः कुऱ्हे, मुक्ताईनगर.

रावेर ः ऐनपूर, रावेर, खानापूर, सावदा, खिर्डी, खिरोदा, निंभोरा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com