Organic Farming
Organic Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Organic Farming In Parbhani: शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचे तंत्र अवगत करण्याची गरज

Team Agrowon

Parbhani News : शेतीतील विविध निविष्‍ठांचा पुनर्वापर करण्‍याची क्षमता सेंद्रिय शेतीत असून सेंद्रिय शेती (Organic Farming) पर्यावरण अनुकूल व जैव विविधता राखू शकणारी शेती आहे. पीक लागवडीपासून ते शेतीमाल विपणनापर्यंत सेंद्रिय शेतीत अनेक समस्‍या आहेत.

यावर शेतकरी बचत गट, गट शेती, शेतकरी उत्‍पादक कंपन्यांच्या माध्यमातून मात करू शकते सेंद्रिय शेतीचे तंत्र शिकण्‍याची आवश्‍यकता आहे, असे प्रतिपादन मोदीपुरम (मीरत, उत्तर प्रदेश) येथील भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर)अंतर्गत - भारतीय एकात्मिक शेती पद्धती संशोधन संस्थेचे संचालक डॉ. सुनील कुमार यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील सेंद्रिय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्‍या वतीने ऑनलाइन व ऑफलाईन पद्धतीने आयोजित राज्‍यस्‍तरीय तीनदिवसीय सेंद्रिय शेती प्रशिक्षणाचे उद्‍घाटन सोमवारी (ता. २७ ) करण्यात आले असून, सदर प्रशिक्षणाच्‍या उद्‍घाटन प्रसंगी ते बोलत होते.

अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू डॉ. इंद्र मणी मिश्रा होते व्‍यासपीठावर कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे माजी उपायुक्‍त डॉ. ध्रुवेंद्र कुमार, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल, कृषी उपसंचालक बळिराम कच्छवे उपस्थित होती.

प्रशिक्षणास मराठवाडा विभागातील शेतकरी, कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ, कृषी शास्त्रज्ञ, विद्यार्थी, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवी संस्थांचे सदस्य सहभागी झाले असून, प्रशिक्षणाचे थेट प्रक्षेपण विद्यापीठाचे यू-ट्यूब चॅनेल https://www.youtube.com/@VNMKV वर करण्‍यात येत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT