Balasaheb Thorat Agrowon
ॲग्रो विशेष

Pune-Nashik Highway : पुणे-नाशिक औद्योगिक महामार्गाविरोधात शेतकऱ्यांनी घेतली थोरात यांची भेट

Balasaheb Thorat : पुणे नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग कायमस्वरूपी रद्द करावा या मागणीसाठी बाधित शेतकरी संघर्ष समितीचे प्रमुख बाळासाहेब औटी यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष समिती पदाधिकाऱ्यांनी शनिवारी (ता. १४) बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन निवेदन दिले.

Team Agrowon

Pune News : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग असताना नवीन औद्योगिक महामार्गाची आवश्यकता नाही हे कशासाठी चालले आहे? याचे कोडे मलाही उलगडलेले नाही, असे मत काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर येथे व्यक्त केले.

पुणे नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग कायमस्वरूपी रद्द करावा या मागणीसाठी बाधित शेतकरी संघर्ष समितीचे प्रमुख बाळासाहेब औटी यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष समिती पदाधिकाऱ्यांनी शनिवारी (ता. १४) बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन निवेदन दिले.

या वेळी समितीचे सहप्रमुख माऊली शेळके वल्लभ शेळके, समन्वयक मोहन नायकवडी, ज्ञानेश्वर शेळके, अविनाश हाडवळे, गोविंद हाडवळे, तसेच संगमनेर तालुक्यातील शेडगाव, मालुंजे, डिग्रज, काही शेतकरी उपस्थित होते. त्या वेळी थोरात बोलत होते.

शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने शनिवारी (ता. १५) शेडगाव येथील फड वस्ती, ओझर येथील बाधित शेतकऱ्यांच्या भेटी देऊन संवाद यात्रेच्या निमित्ताने त्यामध्ये भूसंपादनाचा कायदा, बाधित शेतकरी त्याचे होणारे विस्थापन, १९५५ व १९५६ चा भूसंपादनाचे कालबाह्य कायदे रद्द करा आणि २०१३ चा भूसंपादनाचा कायदा जसा आहे, तसा अमलात आणा आदी मागण्यांबाबत या संवाद यात्रेच्या निमित्ताने बाधित शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली.

या संवाद यात्रेच्या निमित्ताने शेडगाव येथील अशोक फड व अनिल नागरे म्हणाले, की पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी या पट्ट्यातील शेतकऱ्यांचा प्रखर विरोध आहे, याची शासनाने दखल घ्यावी; अन्यथा आंदोल उभे केले जाईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ginger Research Center: आले संशोधन केंद्राचा पेच; कृषिमंत्र्यांच विधानपरिषदेत बैठकीचं आश्वासन 

Silk Market : बीड रेशीम कोष बाजारात शेतकऱ्यांचे शोषण

Turmeric Market : नांदेडला हळदीचे चुकारे थकल्याने लिलाव पाडले बंद

Agriculture Mechanization : टिलरने वाढले शेतकऱ्यांचे बळ

Agrowon Podcast: तुरीचा बाजार मंदीतच; हळदीला मर्यादीत उठाव, कांदा स्थिर, गवार तेजीत, तर कोबीची आवक कायम!

SCROLL FOR NEXT