Pune Bangalore Highway : कोल्हापुरातील अंगणवाडी सेविका पुणे -बंगळुरू महामार्ग रोखणार, आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

Anganwadi workers : मागच्या ४६ दिवसांपासून राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी बेमुदत संप पुकारला आहे.
Pune Bangalore Highway
Pune Bangalore Highwayagrowon

Pune Bangalore Highway : मागच्या ४६ दिवसांपासून राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी बेमुदत संप पुकारला आहे. मानधनवाढीसह अन्य मागण्यांसाठी पुकारलेला संप आता चिघळण्याची शक्यता आहे. संपाकडे शासनाने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी (दि.२३) जानेवारीला कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाकडून महामार्ग रोखण्याचा निर्णय घेतला आहे.

अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने संपाची तिव्रता वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर अंगणवाडी सेविका दि. २४ जानेवारीला मंत्रालयावर मोर्चा काढणार आहे. मंत्रालयावर राज्यव्यापी मोर्चा असणार आहे. तब्बल ४६ दिवस चालणाऱ्या संपाला अद्यापही यश न आल्याने अंगणवाडी सेविका आता आक्रमक होण्याची शक्यता आहे.

अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी दि. ०४ डिसेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे. कर्मचारी संघाचे अध्यक्ष अतुल दिघे व सचिव सुवर्णा तळेकर यांनी मंगळवारी महामार्ग रोखण्यात येणार असल्याची माहिती पत्रकाद्वारे दिली आहे. दि. २२ जानेवारीपर्यंत मंत्रिमंडळाने भरीव निधी, पेन्शन, ग्रॅच्युएटीच्या निर्णयाबाबत कृती समितीला लेखी काहीच कळविले नाही तर आम्ही जोरदार आंदोलन करणार असल्याचे थेट सांगण्यात आले आहे.

Pune Bangalore Highway
Kolhapur Sugarcane : महिलेची ऊस शेतीत क्रांती, एकरी १५० टन उत्पादन घेत मिळवला राज्य पुरस्कार

घंटानाद मोर्चा काढणार

अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचे आंदोलन अधिक तीव- करण्यात येणार असल्याचे आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य बालवाडी, अंगणवाडी कर्मचारी युनियनचे अध्यक्ष सतीशचंद्र कांबळे व सचिव शुभांगी पाटील यांनी सांगितले. महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी मुबंईत संयुक्त बैठक बोलविण्याबाबत आश्वासन दिले होते. परंतु, अद्याप त्याबाबत काही कार्यवाही झाल्याचे दिसत नाही.

मुंबईत अंगणवाडी सेविकांचा आवाज घुमणार

अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या संपाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि. २४ जानेवारी रोजी मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात राज्यातील अंगणवाडी महिला कर्मचारी सहभागी होणार आहेत. त्यामुळे कोल्हापुरातील सर्व अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने आप्पा पाटील व जयश्री पाटील यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com