Onion Subsidy
Onion Subsidy Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Subsidy : सरसकट कांदा अनुदानासाठी शेतकऱ्यांचा तहसीलवर मोर्चा

Team Agrowon

Nagar News : बाजार समितीच्या (Market Committee) आवाराबाहेरील व्यापाऱ्यांच्या कांदा पट्ट्या स्वीकारून शेतकऱ्यांना सरसकट कांदा अनुदान द्यावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जामखेड येथे तहसील कार्यालयावर सोमवारी (ता. १०) मोर्चा नेण्यात आला.

जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीकडून कांदा विक्रीच्या पट्ट्या व अहवाल मिळण्याबाबत टाळाटाळ होत आहे. त्यामुळे तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी अनुदान मिळण्यापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर होत असलेल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काल (सोमवारी) जामखेड तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा आला.

मोर्चात पक्षाचे पदाधिकारी व शेतकरी सहभागी झाले होते. शेतकऱ्यांचा हा मोर्चा पंचायत समिती समोरून काढण्यात येऊन तहसील कार्यालयासमोर त्याचे सभेत रूपांतर झाले.

शासनाने कांदा अनुदानासाठी लावलेल्या जाचक अटी रद्द करून ई-पीकपेरा नोंदीबरोबर तलाठ्यामार्फत लावलेल्या हस्तलिखित नोंदीही ग्राह्य धरून सर्वांना सरसकट

अनुदान द्यावे. बाजार समिती बाहेरील व्यापाऱ्यांच्याही खरेदी पावत्या ग्राह्य धराव्यात. शेतकऱ्यांबाबत कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन केला जाणार नाही. कांदा अनुदानाबाबत जाचक अटी रद्द न केल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा या वेळी मोर्चेकरांनी दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Wheat Procurement : सरकारचं गहू खरेदीचं उद्दिष्ट पूर्ण होणार का? | राज्यात पावसाचा दणका | राज्यात काय घडलं?

Heavy Rain : जेवळी परिसरात जोरदार पावसामुळे मोठे नुकसान

Goat Farming : ऋतुनिहाय व्यवस्थापन बदलावर भर

Agriculture Machinery : गरजेनुसार हवीत कृषी यंत्रे-अवजारे

Kharif Management : हवामान बदलातील खरीप नियोजन

SCROLL FOR NEXT