Kolhapur Farmers agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Farmers : वैरणीसाठी गेलेल्या शेतकऱ्याचे मधमाश्यांनी संपवलं जीवन, दोन जखमी

Panhala Honey Bee : पन्हाळा तालुक्यातील केखले येथे वैरण काढताना मधमाश्‍‍यांनी केलेल्या हल्ल्यात एका वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू, तर दोघे जखमी झाले.

sandeep Shirguppe

Farmers Life Ended Bees : पन्हाळा तालुक्यातील केखले येथे वैरण काढताना मधमाश्‍‍यांनी केलेल्या हल्ल्यात एका वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू, तर दोघे जखमी झाले. संभाजी बाबू कोलुले (वय ६५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. एकावर कोडोलीतील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, संभाजी कोलुले काल (ता.१७) सकाळी पाझर तलावाशेजारच्या तराळकी नावाच्या शेतात वैरण काढत होते. अचानक आलेल्या मधमाश्‍‍यांच्या थव्याने संभाजी कोलुले यांच्यावर हल्ला चढविला. मधमाश्‍‍यांनी कोलुले यांचे तोंड, गळा, तसेच हातापायांवर प्रचंड चावा घेतला.

असह्य वेदनांमुळे कोलुले ओरडत उसाबाहेर आले तरीसुद्धा मधमाश्यांनी त्यांचा पाठलाग सोडला नव्हता. मधमाश्यांच्या तावडीतून वडिलांची सुटका करण्यासाठी धावलेला त्यांचा मुलगा युवराज व भाऊ लक्ष्मण यांनादेखील मधमाश्यांनी चावा घेतला. मधमाश्यांच्या हल्ल्यात संभाजी कोलुले बेशुद्ध पडले होते. त्यांना घोंगड्यात लपेटून उपचारासाठी कोडोली येथील उपजिल्हा शासकीय रुग्णालयात नेले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांना डॉक्टरांनी मृत घोषत केले.

संभाजी कोलुले वारणा दूध संघाचे निवृत्त कर्मचारी होते. मुलगा युवराज यांच्यावर कोडोली येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संभाजी कोलुले यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

India Cotton Import: कापूस आयातीवरील शुल्क हटवले

Amitabh Pawade Death: अमिताभ पावडे यांचे अपघाती निधन

MahaDBT Portal: महाडीबीटीमधील गोंधळामुळे फलोत्पादन संचालकही हैराण

Maharashtra Heavy Rain: पीक नुकसानीसह चिंताही वाढली

Maharashtra Rain Update: कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहणार

SCROLL FOR NEXT