DCM Ajit Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

APMC Reforms : बाजार समित्यांबाबत निर्णय घेताना शेतकऱ्यांचं हित सर्वोच्च: उपमुख्यमंत्री अजित पवार

Market Committee: केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण विभागाच्या नवीन २०१७ च्या कायद्यातील तरतूदीनुसार महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) या १९६३ च्या कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर बैठक आयोजित करण्यात आली.

Dhananjay Sanap

Ajit Pawar : राज्यातील बाजारांचा विकास करताना शेतकऱ्यांचं हित जपलं पाहिजे. बाजार समित्यांसदर्भातील निर्णय घेत असताना शेतकऱ्यांते हित सर्वोच्च असावं, अशी निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समित्यासंदर्भातील विविध प्रश्नांवर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात गुरुवारी (ता.१५) बैठक आयोजित करण्यात आली.

केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण विभागाच्या नवीन २०१७ च्या कायद्यातील तरतूदीनुसार महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) या १९६३ च्या कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, पणनमंत्री जयकुमार रावल यांच्यासह संबधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, " राष्ट्रीय नामांकित बाजार प्रस्तावानुसार राष्ट्रीय बाजार समिती स्थापन झाल्यानंतर शासनाकडून त्यासमितीवर नामनिर्देशित व्यक्तींची नियुक्ती होणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करुनच यासंदर्भातील निर्णय घ्यावा," अशी सूचनाही उपमुख्यमंत्री पवार यांनी केली आहे.

या बैठकीत राज्यस्तरीय बाजार विकसित करणे, कृषी उत्पन्न बाजार समिती कर सुधारणा करणे, कृषी उत्पन्न बाजार समित्यांची देखभाल दुरुस्ती, वस्तू व सेवाकराबाबत अडचणी, छोटे उद्योग व व्यापाऱ्यांच्या व्यवसाय कराबाबतच्या समस्या, कळंबोली येथे स्टील मार्केटसाठी सिडकोच्या माध्यमातून जमीन उपलब्ध करुन देणे आदी विषयांवर चर्चा झाली.

शेतकरी हितासाठी सर्वोच्च स्थान असल्याचं उपमुख्यमंत्री पवार म्हणाले. ते म्हणाले, "राष्ट्रीय नामांकित बाजार अनुषंगाने राज्यस्तरीय बाजारांचा विकास करताना राज्यातल्या शेतकऱ्यांचे हित जपले गेले पाहिजे. बाजार समिती सदस्यांच्या अधिकारांचे रक्षण झाले पाहिजे. बाजार समिती सदस्य जनप्रतिनिधींमधून निवडून येतात. शेतकऱ्यांचे, समाजातील विविध घटकांचे प्रतिनिधीत्व करतात. या सदस्यांचे अधिकार कायम ठेवण्यातच शेतकरी व समाजाचे हित आहे. यातूनच बाजार समित्या अधिक कार्यक्षम, बळकट होतील." 

जीएसटी आकारणीत सुसूत्रता, व्यापाऱ्यांना अकारण होणारा त्रास थांबवण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. करचुकवेगिरी रोखण्यासाठी जीएसटी वसुली पद्धतीत सुधारणांसंदर्भात व्यापारी संघटनांनी केलेल्या मागण्यांवर सकारात्मक विचार केला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली. तसेच उद्योग, व्यापार क्षेत्रात अधिक सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री पवार यांनी बैठकीत दिल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Maharashtra 2026 : दुष्काळाच्या स्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Maharashtra Cabinet Decisions: साखर कारखाने, ऊस शेतकऱ्यांना दिलासा; ७५० कोटींच्या सॉफ्ट लोन धोरणाला मंजुरी, मुख्यमंत्र्यांची माहिती

Dam Water Storage Update: यावल, रावेरातील प्रमुख सिंचन प्रकल्प भरले

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT