Sunflower Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Sunflower Farming : ऊस पट्ट्यात सूर्यफूल पिकाकडे शेतकऱ्यांचा कल

Sunflower Production : शेतकऱ्यांमध्ये तेलबिया पिकाविषयी महत्त्व वाढू लागत असल्यामुळे ऊस पट्ट्यातील शेतकरी सूर्यफूल पिकांकडे वळू लागले आहेत.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : शेतकऱ्यांमध्ये तेलबिया पिकाविषयी महत्त्व वाढू लागत असल्यामुळे ऊस पट्ट्यातील शेतकरी सूर्यफूल पिकांकडे वळू लागले आहेत. दौंड तालुक्यात सूर्यफुलाची १६१ हेक्टरवर पेरणी झाली असून, पिके सध्या वाढीच्या अवस्थेत असल्याने चांगले उत्पादन मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

मागील दोन ते तीन वर्षांपासून पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये तेलबियाविषयी जनजागृती केली जात आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात सूर्यफूल पेरणीच्या क्षेत्रात वाढ होऊ लागली आहे. यात बारामती तालुक्यात सर्वाधिक पेरणी झाली असली तरी त्यानंतर पुरंदर आणि दौंडमध्ये पेरणी झाली आहे. प्रामुख्याने दौंड तालुका हा उसाचे आगार म्हणून ओळखले जातो. त्यामुळे तेलबिया पिकाकडे वळण्याचे शेतकऱ्यांचे प्रमाण कमी असल्याने मागील काही वर्षात सूर्यफूल पीक या तालुक्यातून नामशेष होण्याच्या मार्गावर होती. परंतु तेलाच्या दरात वाढ झाल्यामुळे शेतकरी आता तेलबिया पिकांकडे वळत आहेत.

सध्या दौंडच्या पूर्वभागातील मळद या गावात कृषी विभागाच्या सहकार्याने सूर्यफुलाचे पीक जोमात डौलत आहे. यामध्ये मळद, खडकी, रावणगाव या गावांत सूर्यफूल पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत प्रात्यक्षिके देण्यात आली आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या शेती शाळा घेण्यात आल्या. या वर्षी पाऊस वेळेवर पडल्यामुळे व कृषी विभागाने नावीन्यपूर्ण बाब म्हणून शासनाच्या राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन व इतर गळीतधान्य उत्पादन वाढ मूल्यसाखळी विकास योजनेतून दौंड तालुक्यातील मळद या गावासाठी संकरित सूर्यफूल बियाणे व इतर निविष्ठा शेतकऱ्यांना पुरवल्या होत्या.

मळद येथील कृषी सहायक अझर सय्यद हे वेळोवेळी बांधावर जाऊन शेतकऱ्यांना या पिकाबाबत मार्गदर्शन करत आहेत. याचेच फलित म्हणजे या गावात व परिसरात यंदा सुमारे साठ एकर क्षेत्रावर सूर्यफूल पिकाची लागवड झालेली आहे. आता पीक फुलोरा अवस्थेत आहे. या भागातील ऊस पट्ट्यातील शेतकरी पीक बदल करून या पिकाकडे आकर्षित होत आहे. खाद्य तेलाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होत आहेत. येथील या पीक प्रात्यक्षिकाची पाहणी पुणे विभागाचे सहसंचालक रफिक नाईकवडी यांनी देखील केली असून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत.

कृषी विभागाच्या प्रयत्नामुळे तेलबिया पिकाखालील लागवडीचे क्षेत्र वाढत आहे. त्यामुळे परिसरात तेलघाण्याची संख्या वाढत आहे व स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होत आहे.
राहुल माने, तालुका कृषी अधिकारी, दौंड
मी या वर्षी एक ते दोन एकरांवर सूर्यफुलाची पेरणी केली आहे. संकरित सूर्यफूल बियाण्यांमुळे एकरी आठ ते दहा क्विंटल उत्पादन अपेक्षित आहे.
भीमराव भागवत, प्रगतिशील शेतकरी, मळद

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Heavy Rain: घाटमाथ्यावर जोरदार सरी

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथ्यावर ‘ऑरेंज अलर्ट’

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

SCROLL FOR NEXT