Budget Maharashtra 2024 Agrowon
ॲग्रो विशेष

Budget Maharashtra 2024 : राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार सौर कुंपणासाठी अनुदान; अर्थमंत्री अजित पवारांची घोषणा

राज्य सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी (ता.२७) विधानसभेत मांडला.

Dhananjay Sanap

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवनविकास योजने अंतर्गत शेतकऱ्यांना सौर कुंपणासाठी अनुदान देण्यात येणार आहे, अशी घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे. ज्या भागात वीज पोहचलेली नाही, तेथील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठांतर्गत परळी येथील जिरेवाडी येथे सोयाबीन प्रक्रिया उपकेंद्र, कृषी महाविद्यालय, कृषी व्यवस्थापन विद्यालय स्थापन करण्यात येणार आहे, अशी घोषणा त्यांनी केली.

सोमवारी (ता.२६) राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी (ता. २७) विधानसभेत अंतरिम अर्थसंकल्प मांडला. राज्यातील ११ गड किल्ल्यांना जागतिक वारसास्थळ जाहीर करण्याचा प्रस्ताव युनेस्कोला पाठवला आहे, तसेच जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय उभारण्यात येणार आहे, असे अर्थमंत्री म्हणाले. तसेच केंद्र सरकारने ८ हजार ६१६ कोटी रुपये वस्तु व सेवा कराची (जीएसटी) रक्कम राज्य सरकारला दिली आहे, अशी माहिती अर्थमंत्र्यांनी दिली.

राज्यातील शेतकऱ्यांना वन्यजीव प्राण्यांनी पुरते बेजार केले आहे. त्यामुळे शेताला कुंपण देण्यात यावं, अशी मागणी शेतकरी करत होते. विधानसभेतही मंगळवारी (ता.२७) विरोधी पक्षाच्या आमदारांनी या विषयाकडे लक्ष वेधले होते.

ऊर्जा क्षेत्रात ४० टक्के अपारंपारिक उर्जेचा वापर करण्याचा केंद्र सरकारचा उद्देश आहे. त्यासाठी राज्यातही रूफ टॉप सोलर योजना लागू करण्यात येत आहे. त्यासाठी ७८ हजार रुपये मर्यादेपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे, असेही पवार म्हणाले. सर्व योजनांचे सौर उर्जीकरण करण्यासाठी पुढील दोन वर्षात आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचा दावाही अर्थमंत्र्यांनी केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bopodi Land Dispute: बोपोडीतील वादग्रस्त जमीन पूर्णतः शासकीय मालकीची

Yashwant Factory Land Scam: ‘यशवंत’ जमीन विक्री व्यवहार ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर

Ai in Agriculture: ऊस उत्पादकता वाढीत ‘एआय’चे मोठे योगदान

Canal Committee Meeting: कालवा सल्लागार समिती बैठकीला आचारसंहितेचा अडसर

Rabi Crop Competition: रब्बी हंगामातील अन्नधान्य, कडधान्य, गळीतधान्य पीकस्पर्धा

SCROLL FOR NEXT