Milk Subsidy Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Subsidy : नव्या वर्षातही शेतकऱ्यांना दूध अनुदानाची प्रतीक्षा ; सातारा जिल्ह्यातील ३९,१८४ शेतकऱ्यांचे अनुदान थकलेले

Milk Rate subsidy : विधानसभा निवडणुकीच्या अगोदरपासूनच रखडलेले दूध दर अनुदान नवीन वर्षांत तरी मिळणार का, असा प्रश्न शेतकऱ्यांतून उपस्थित होऊ लागला आहे.

Team Agrowon

सातारा : विधानसभा निवडणुकीच्या अगोदरपासूनच रखडलेले दूध दर अनुदान नवीन वर्षांत तरी मिळणार का, असा प्रश्न शेतकऱ्यांतून उपस्थित होऊ लागला आहे. जिल्ह्यातील ३९ हजार १८४ शेतकऱ्यांचे सहा कोटी १८ लाख रुपयांचे अनुदान थकलेले आहे. त्यांना पाच व सात रुपयांप्रमाणे ऑक्टोबर, नोव्हेंबरमधील प्रलंबित अनुदान देण्यासाठी मंत्रालय स्तरावरून हालचाली सुरू झाल्या आहेत.

प्रत्यक्ष खात्यावर अनुदान कधी पडणार याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत.
महायुतीच्या सरकारने दूध दरातील तफावत दूर करून शेतकऱ्यांना अनुदानाच्या रुपाने मदत करण्यासाठी लिटर मागे पाच ते सात रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला. पण, काही महिनेच शेतकऱ्यांना वेळेत हे अनुदान मिळाले.

विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीपासून दूध अनुदान रखडत गेले आहे. आता नवीन वर्ष उजाडले तरी अनुदानाचा पत्ता नसल्याने शेतकऱ्यांत अस्वस्थता वाढली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन झाले. जिल्ह्याला चार कॅबिनेट मंत्री पदे व वजनदार खाती मिळाली. महायुतीचे सरकार हे सर्वसामान्यांचे व शेतकऱ्यांचे सरकार असल्याचे सातत्याने बोलले जात आहे. पण, या सरकारकडून शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित ठेवले जात आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दूध अनुदानापोटी मिळणारे सहा कोटी १८ लाख रुपये रखडले आहेत. नवीन वर्षांत तरी दूधाचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होतील, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.

सातारा जिल्ह्यातील स्थिती
  पाच रुपये दूध अनुदान मिळणारे शेतकरी ः ७, ६१४.
  त्यांच्याकडील एकूण जनावरे ः२२ हजार २११.
  दूध संकलन ः २४ लाख ९ हजार ३११ लिटर.
  अनुदान मिळणे बाकी ः एक कोटी ६७ लाख ११ हजार ११४ रुपये.

‘काही दिवसांत अनुदान मिळेल’
‘‘दूध अनुदानामध्ये ३१ हजार ५७० शेतकरी असून त्यांच्याकडील जनावरांची संख्या एक लाख ५६ हजार आहे. तर दूध संकलन ९१ लाख ५७ हजार ९२९ लिटर आहे. त्यांचे चार कोटी ५० लाख ९० हजार ८२० रुपये अनुदान थकलेले आहे. सध्या मंत्रालय स्तरावरुन थकित दूध अनुदान देण्याबाबतची प्रक्रिया सुरू असून आगामी काही दिवसांत हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील,’’ असे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dam Storage: अकोला, बुलडाण्यातील प्रकल्प तुडुंब

Khandesh Heavy Rain: खानदेशात २५ हजार हेक्टरवरील पिकांची वाताहत

Water Conservation: लोकसहभागातून जलसमृद्ध गावाची लोक चळवळ व्हावी

Solapur Heavy Rain: सोलापुरात आठ मंडलांत अतिवृष्टी,सोयाबीनसह तूर, उडदाचे नुकसान

Mango Orchards: बागेत पाणी साचल्याने झाडांच्या मुळांची होते दमकोंडी

SCROLL FOR NEXT