Agriculture Subsidy : दोन लाख अठरा हजार शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा

Farmers Waiting for Subsidy : नांदेड जिल्ह्यात कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी वाढ विशेष कृती योजनेअंतर्गत कापूस व सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी पाच हजार रुपये देण्यात येत आहेत.
Agriculture Subsidy
Agriculture SubsidyAgrowon
Published on
Updated on

Nanded News : नांदेड जिल्ह्यात कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी वाढ विशेष कृती योजनेअंतर्गत कापूस व सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी पाच हजार रुपये देण्यात येत आहेत. या योजनेअंतर्गत आजपर्यंत जिल्ह्यातील पाच लाख नऊ हजार ७०३ शेतकऱ्यांना १८२ कोटी ६७ लाख ३७ हजार ३६५ रुपये वितरित करण्यात आले आहेत. अद्याप दोन लाख १८ ३५७ शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा आहे, अशी माहिती सूत्राने दिली.

नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीन पिकांच्या उत्पादकांना खरीप हंगाम २०२३ मध्ये शेतीमालाच्या किमतीतील घसरणीमुळे नुकसान सोसावे लागले होते. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रतिहेक्टरी पाच हजार रुपयांचे अर्थसाह्य देण्यात येत आहे.

Agriculture Subsidy
Agriculture Subsidy : सात लाख शेतकऱ्यांना २१०० कोटींचा लाभ

यात खरीप हंगाम २०२३ मधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन आरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार, तर त्यापेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टरी पाच हजार रुपये (दोन हेक्टरच्या मर्यादेत) अर्थसाह्य मंजूर करण्यात आले. या योजनेअंतर्गत नांदेड सात लाख २८ हजार ६० शेतकरी पात्र ठरले आहेत.

Agriculture Subsidy
Agriculture Subsidy : रब्बी प्रात्यक्षिकांसाठी शेतकऱ्यांना अनुदान मिळणार

यात ८१ हजार १११ कापूस उत्पादक, तर चार लाख २८ हजार ५९२ सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांना आजपर्यंत प्रतिहेक्टरी पाच हजारांच्या मर्यादेत १८२ कोटी ६७ लाख ३७ हजार ३६५ रुपये वाटप करण्यात आले आहेत.

तर ई-केवायसी केले नसलेले, सहमती पत्र दाखल न केलेले तसेच पीकपेरा नसलेले असे एकूण दोन लाख १८ हजार ३५७ शेतकऱ्यांना मात्र अनुदान मिळाले नाही. कापूस व सोयाबीन अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी एक हजार ५४८ कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हजार ६४६ कोटी असे एकूण चार हजार १९४ कोटी मंजूर झाले. हा खर्च शेतकऱ्यांच्या उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी वाढ विशेष कृती योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com