Farmers Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Demand : आगारदांडा रेल्वे विरोधात रोह्यातील शेतकरी एकवटले

Agardanda Railway Farmer Issue : 1अष्टमी भालगाव मार्गे आगारदांडा रेल्वे मालगाडी मार्गासाठी जमीन संपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर ई-पेन्सिल नोंदी टाकण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे.

Team Agrowon

Roha News : 1अष्टमी भालगाव मार्गे आगारदांडा रेल्वे मालगाडी मार्गासाठी जमीन संपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर ई-पेन्सिल नोंदी टाकण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे.

त्‍यामुळे जमीन संपादन प्रक्रियेविरोधात शेतकऱ्यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीत विविध मागण्या मांडण्यात आल्या आहेत. सदरील मागण्या मान्य न केल्यास आंदोलन छेडणार असल्याचा इशारा प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी दिला आहे.

केंद्र सरकारने नुकतीच मंजुरी दिलेल्या दिघी पोर्टसाठी रोहा ते आगारदांडा मालवाहतूक रेल्वे मार्गाकरिता जमीन संपादन प्रक्रिया सुरू झाली आहे, मात्र शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सदरील संपादन प्रक्रिया सुरू असल्याचा दावा, शेतकऱ्यांनी केला आहे.

त्‍यामुळे रेल्‍वे प्रशासनाच्‍या या मनमानी कारभाराविरोधात पुढची दिशा ठरविण्यासाठी रोहे तालुक्यातील कांडणे येथे शेकतरी व स्थानिक नागरिकांची विभागीय सभा पार पडली. या वेळी व्यासपीठावर अध्यक्ष श्रीनिवास साठे, शेतकरी नेते राजेंद्र जाधव, रेल्वे प्रकल्प अभ्यासक नथुराम माळी, अंकुश मिसाळ तसेच विभागातील आठ गावातील शेतकरी व प्रमुख नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अध्यक्ष श्रीनिवास साठे यांनी दि. बा. पाटील व प्रभाकर पाटील यांच्यासारखा शेतकऱ्यांचा खंभीर नेता राहिलेला नाही. त्यामुळे शासन आणि प्रशासनाविरोधात लढण्यासाठी संघटित होऊन संघर्ष करावा लागणार असल्याचे सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दि. बा. पाटील यांनाच आदर्शवत मानून लढा देऊ, असे परखड मत श्रीनिवास साठे यांनी व्यक्त केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: तुरीचा बाजार मंदीतच; हळदीला मर्यादीत उठाव, कांदा स्थिर, गवार तेजीत, तर कोबीची आवक कायम!

Soil Health : जमिनीचे आरोग्य सांभाळणे गरजेचे

Nagnathanna Nayakvadi : नागनाथअण्णांसारख्या क्रांतिकारकांमुळे देशाला स्वातंत्र्य

Wild Boar : रानडुकराला उपद्रवी वन्य प्राणी घोषित करा

Lumpy Skin Disease: पुण्यात 'लम्पी'चा विळखा; सुप्रिया सुळेंची महापालिका आयुक्तांना उपाययोजनांची पत्राद्वारे विनंती

SCROLL FOR NEXT