Farmers Training : विद्यापीठात कडधान्य, तृणधान्य व फळ प्रक्रियेवर शेतकरी प्रशिक्षण

PDKV Akola : . संशोधन अभियंता डॉ. प्रमोद बकाने यांनी या चार दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली.
PDKV Akola
PDKV Akola Agrowon
Published on
Updated on

Akola News : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत कापणीपश्चात अभियांत्रिकी व तंत्रद्यान विभागात कार्यरत अखिल भारतीय समन्वयित प्रकल्प तसेच जळगाव जिल्हा आत्मा विभागाच्या वतीने कडधान्य, तृणधान्य व फळ प्रक्रियेवर आधारित चार दिवसांचे शेतकरी प्रशिक्षण घेण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुरेंद्र काळबांडे होते. पीकेव्ही मिनी डाळमिल, तेल काढणी सयंत्र, सीताफळ गर काढणी मंत्र, जांभूळ गर काढणी इत्यादी सयंत्रणाच्या आधारे गृहोद्योग स्थापन करता येतो, असे त्यांनी अध्यक्षीय मार्गदर्शनात सांगितले.

PDKV Akola
PDKV Akola : ‘पंदेकृवि’ची उत्पन्न वाढीच्या दिशेने वाटचाल

या प्रशिक्षणाचे सह आयोजक तथा जळगावचे आत्मा व्यवस्थापक भूषण पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. संशोधन अभियंता डॉ. प्रमोद बकाने यांनी या चार दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली.

PDKV Akola
PDKV Akola : ‘पंदेकृवि’ला तीन नव्या प्रकल्पांना मान्यता

या केंद्रामार्फत विकसित केलेल्या पीकेव्ही मिनी डाळमील, सफाई प्रतवारी यंत्र, गहू सफाई यंत्र, बेसन मील, कचरा ज्वलित शुष्क, पंदेकृवि सीताफळ गर निष्कासन यंत्र, पंदेकृवि जांभूळ गर निष्कासन यंत्र, कडधान्य मूल्यवर्धन साखळी इत्यादी सयंत्राबाबत माहिती.

कृषी ड्रोनची ओळख, फवारणीसाठी प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण, अपारंपरिक उर्जा स्रोतांचा वापर दैनंदिन आहारात तृणधान्यांचे महत्त्व, पौष्टिक तृणधान्यांचे बेकरी उत्पादने, ब्रेडिंग आणि मार्केटिंग, गांडूळ खत निर्मिती, जैविक कीडनाशक उत्पादन व त्यांचा पिकावरील वापर, ज्वारी पिकाच्या विविध सुधारित, संकरीत जातींची ओळख व उत्पादन पध्दती इत्यादी विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन व प्रात्यक्षिक देण्यात आले. या प्रशिक्षणात जळगाव जिल्ह्यातील ६० शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. त्यापैकी ३६ महिला आणि २४ पुरुष होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com