Fruit Crop Insurance  Agrowon
ॲग्रो विशेष

Fruit Crop Insurance : पालघरमध्ये बागायतदार भरपाईपासून वंचित

Crop Damage : जिल्ह्यातील सातशेहून अधिक विमाधारक आंबा बागायतदारांना नुकसानभरपाईची लाखोंची रक्कम विमा कंपन्या टाळाटाळ करत आहे.

Team Agrowon

Palghar News : जिल्ह्यातील सातशेहून अधिक विमाधारक आंबा बागायतदारांना नुकसानभरपाईची लाखोंची रक्कम विमा कंपन्या टाळाटाळ करत आहे. त्यामुळे अखेर संतप्त बागायतदारांनी जिल्हाधिकारी आणि कृषी कार्यालयावर धडक दिली.

लवकरात लवकर थकवलेली लक्षावधी रुपयांची भरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी प्रशासनाला १५ दिवसांची मुदत दिली असून न्याय न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही बागायतदारांनी दिला आहे.

पालघर जिल्ह्याच्या विक्रमगड तालुक्यातील चिंचघर, वाडा तालुक्यातील खानिवली मेट, कोने, डहाणूतील वाणगाव, आंबेसरी, जव्हारमधील जामसर या भागात २०२३-२४ मध्ये अवकाळीमुळे आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले होते.

१५ कृषी मंडळांतील गावांमध्ये असलेले अनेक बागायतदार सध्या चिंतेत सापडले आहेत. विक्रमगड, तसेच अन्य भागातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शुक्रवारी (ता. १०) भरपाईसाठी जिल्हाधिकारी गोविंद बोडके व जिल्हा कृषी अधिकारी नीलेश बागेश्वर यांची भेट घेतली.

तसेच त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून आंबा उत्पादक शेतकऱ्यांना लवकर भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. नवीन कृषी मंडळ स्थापन झाल्याने अनेक अडचणींचा सामना बागायतदारांना करावा लागत आहे. भरपाई देण्याबाबत वारंवार अर्ज, विनंत्या करूनही विमा कंपन्या लक्ष देत नाहीत.

हेक्टरीच्या प्रमाणात आंबा फळपीक विमा योजना काढला जात असून १०० आंब्यांसाठी २२ हजारांच्या जवळपासची विमा कवच रक्कम शेतकऱ्यांमार्फत भरली जाते. दरवर्षी नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना कमाल एक लाख २२ हजार, तर किमान ८६ हजार रुपये हेक्टर या प्रमाणात नुकसानभरपाई मिळते, मात्र ती अजूनही मिळाली नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indigenous Cows Status: गाय हा उपयुक्त प्राणी!

Farmers Reform: आर्थिक सुधारणांतून उगवेल स्वातंत्र्याची पहाट

Water Conservation: गोकवडीत जलसंधारण, शैक्षणिक सुविधा उभारल्या

Chhatrapati Sugar Factory: ‘छत्रपती’च्या कामगारांना १० टक्के वेतनवाढ

Agriculture Research: रंगीत बटाटा प्रयोगाची तज्ज्ञांकडून पाहणी

SCROLL FOR NEXT