Leopard Terror Agrowon
ॲग्रो विशेष

Pune Leopard Terror : उत्तर पुणे जिल्ह्यातील शेतकरी बिबट्याच्या दहशतीखाली

Leopard Attack in Pune : उत्तर पुणे जिल्ह्यातील बिबट्यांच्या मानवावरील वाढत्या हल्ल्यांमुळे शेतकरी प्रचंड दहशतीखाली आहेत.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : उत्तर पुणे जिल्ह्यातील बिबट्यांच्या मानवावरील वाढत्या हल्ल्यांमुळे शेतकरी प्रचंड दहशतीखाली आहेत. दोन दिवसांपूर्वी आळे (ता. जुन्नर) येथील शिवांश भुजबळ या बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, निरगुडसर (ता. आंबेगाव) येथील मेंढपाळ कुटुंबाच्या पालावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सात महिन्यांचा मुलगा जखमी झाला आहे.

तर शिवांश या बालकाच्या मृत्यू नंतर दुःख वियोगाने मानसिक संतुलन बिघडलेल्या त्याच्या आई शिल्पा अमोल भुजबळ यांनी गुरूवारी (ता. १२) रात्री कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर या तालुक्यांमध्ये बिबट्या मानव संघर्ष तीव्र झाला आहे. दोन दिवसांपूर्वी आळे (ता. जुन्नर) येथील शिवांश भुजबळ या मुलाच्या मृत्यूनंतर, थोरांदळे (ता. आंबेगाव) येथे मेंढपाळ कुटुंबातील देवा या सात महिन्यांच्या चिमुकल्याचा हात अंथरुणाच्या बाहेर आला आणि दबा धरून बसलेल्या बिबट्याने झेप मारून हात पकडला.

मात्र, त्यावेळी त्याच्या शेजारी झोपलेल्या आईला वेळीच जाग आली आणि तीने बिबट्याचा प्रतिकार सुरू केला. तिने बिबट्याच्या जबड्यातून देवाला सुखरूप खेचलं. मात्र या हल्ल्यात मुलाच्या गळ्याला, हाताला, पोटाला दात आणि पंजा लागला आहे. ही घटना बुधवारी (ता. ११) पहाटे दोनच्या सुमारास येथील फुटाणे मळा येथे ही घटना घडली.

दरम्यान या दोन्ही घटनांनंतर वन विभाग खडबडून जागा झाला असून, आळे (ता. जुन्नर) या ठिकाणी बिबट्याला पकडण्यासाठी लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात बुधवारी (ता. ११) पहाटे चारच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला.

परिसरात आणखी बिबट्यांचा वावर असल्याच्या शक्यतेने वनविभागाने घटनास्थळी व परिसरात १६ ठिकाणी पिंजरे लावले होते, तर १५ ठिकाणी ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले होते.

या क्षेत्राचे थर्मल ड्रोनद्वारे टेहळणी करत २४ तास बिबट्याचा शोध घेत गस्त घालण्यात आला होता. हा बिबट्या नर जातीचा असून, त्यास माणिकडोह येथील बिबट निवारण केंद्रात पाठविण्यात आले आहे.

बिबट्या प्रजनन नियंत्रण कायदा करा ः डॉ. कोल्हे

जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुक्यांत मानव-बिबट्या संघर्ष तीव्र झाला असून, या संघर्षावर मात करण्यासाठी बिबट्यांची वाढती संख्या नियंत्रित करण्यासाठी बिबट प्रजनन नियंत्रण धोरण तयार करावे, अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय वनमंत्री भुपेंद्र यादव व राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या बाबत खासदार डॉ. कोल्हे म्हणाले, ‘‘मानव-बिबट्या संघर्ष कमी करण्यासाठी मी ८ फेब्रुवारी २०२३ रोजी लोकसभेत ‘बिबट प्रजनन नियंत्रण धोरण’ आणण्याची मागणी केली होती. मात्र, केंद्रीय वन मंत्रालयाने या संदर्भात काहीच कार्यवाही केली नाही. राज्याचे वनमंत्री मुनगंटीवार यांनाही पत्र पाठवून राज्य शासनाच्या माध्यमातून बिबट प्रजनन नियंत्रणासाठीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्याची मागणी केली आहे.’’

नऊ महिन्यांत पाच बळी

जुन्नर वन विभागात बिबट्याच्या हल्ल्‍यात गेल्या ९ महिन्यात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत चार बळी गेले होते. तर शिवांशच्या मृत्यू नंतर ही संख्या ५ झाली असून, जखमींची संख्या ११ झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drinking Water Management: टंचाईग्रस्त भागातही पाणी पोहोचविणार : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

Farmers Protest: पीकविम्यासाठी शेतकरी संघटनेचा चाबूक आपटत ‘ठिय्या’

Illegal Organic Fertilizer: वेंगुर्ल्यात विनापरवाना सेंद्रिय खतावर भरारी पथकाची कारवाई

Farm Loan Waiver: कर्जमुक्तीसाठी कोणते शेतकरी पात्र?; पुनर्गठित कर्जाबाबतही महत्त्वाचा निर्णय

Tembhu Irrigation Scheme: ‘टेंभूचे उन्हाळी आवर्तन बंद; ६० ठिकाणचे शेतकरी पाण्याविना

SCROLL FOR NEXT