Leopard Terror : देशवंडीत दुसऱ्या बिबट्याचे दर्शन

Leopard Attack : घाटमळ्यातील शेतकरी भगवान बर्के यांच्या तीन शेळ्यांची सावज हेरून शिकार केली. त्यातील एक शेळी मक्याच्या पिकात ओढून नेले होते.
Leopard Attack
Leopard AttackAgrowon
Published on
Updated on

Latest Marathi News : देशवंडी (ता. सिन्नर) येथील घाटमळात शेतकऱ्यांनी रात्री बिबट्या पाहिला अन् घबराट निर्माण झाली. शेतकऱ्यांनी हातात बॅटऱ्या घेऊन बिबट्याची शोधाशोध केली, तर सिन्नरच्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची पळापळ झाली.

घाटमळ्यातील शेतकरी भगवान बर्के यांच्या तीन शेळ्यांची सावज हेरून शिकार केली. त्यातील एक शेळी मक्याच्या पिकात ओढून नेले होते.

ते भक्ष्य पुन्हा शोधण्यासाठी बिबट्या आला होता. भगवान बर्के परिवाराने गुरुवारी (ता. ६) रात्री साडेदहाला बिबट्या पाहिले. त्यांनी इतर शेतकऱ्यांना भ्रमणध्वनीवरून कळविले. बिबट्याला पळवून लावण्यासाठी हातात टेंभे, मिरचीचा धूर अन् बॅटरीचा प्रकाश शेतकऱ्यांनी शिवारात चमकविला.

Leopard Attack
Leopard Terror : शारदानगर, माळेगाव परिसरात बिबट्याचा वावर

मक्याच्या शेताकडे जाताना बिबट्या मोबाईलमध्ये चित्रीत झाला. तत्काळ सिन्नरच्या वन विभागाच्या गस्ती पथकाला बोलविण्यात आले. वन विभागाचे कर्मचारी आले, तोपर्यंत बिबट्याने मकातून पलायन केले. सर्वांनी दोन तासांपुढे शोध घेतला, पण बिबट्या आढळला नाही. देशवंडीकरांना वनरक्षक संजय गिते यांनी धीर दिला.

Leopard Attack
Black Leopard : फेरफटका मारायला गेले अन् डरकाळी फोडताच...

बिबट्याला पुन्हा शोधताना फटाके वाजविऱ्यात आले व मिरचीचा धूरही करण्यात आला. हे प्रयोग त्याला पुन्हा शोधताना झाले. हा दिसलेला बिबट्या दुसरा आहे. तेथे वन विभाग पिंजरा लावणार आहे. नायगाव शिवारातील कडवा पाटालगत जेजुरकर मळ्यात नर-मादी बिबट्या दिसले.

मक्याच्या शेतात येताना बिबट्या पाहिला. वन कर्मचारी आल्यानंतर टेंभे व बॅटरी घेऊन शोध घेतला. मात्र तो सापडला नाही. नंतर विहिरीच्या मलम्यावर बसलेला दिसला.
- भगवान बर्के, शेतकरी, देशवंडी
मक्याच्या शेतात जाताना विशाल बर्केने मोबाइलमध्ये बिबट्याचा फोटो काढला. तो वन विभागाच्या पथकाला पा आहोत. - तुषार बर्के, देशवंडी
ठवला. आम्ही खूप भेदरलो
रात्री बिबट्या पाहिला. सध्या शिवारात लाल कांदा लागवड सुरू आहे. त्यामुळे आम्हाला कांद्याला रात्रीचे पाणी देता येत नाही.
- संजय कापडी, शेतकरी, देशवंडी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com