Agriculture Minister Manikrao Kokate Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Minister : निर्णय घ्या, अन्यथा कृषिमंत्र्यांच्या घरासमोर ‘बोंबाबोंब’

Nashik Agriculture News : शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दोन दिवसात निर्णय घ्या; अन्यथा कृषिमंत्र्यांच्या घरासमोर बोंबाबोंब आंदोलन छेडू, असा इशारा देण्यात आला आहे.

Team Agrowon

Nashik Farmers : शेतकरी कर्जमाफी, शेतीमाल हमीभाव व कांदा खरेदी अशा विविध मुद्द्यांवर येवला कृषी उत्पन्न बाजार समिती येथे छावा क्रांतिवीर सेनेच्या शेतकरी आघाडीचे जिल्हाप्रमुख गोरख संत हे गेल्या आठवड्यापासून बेमुदत उपोषण करत आहेत. मात्र आंदोलनाची प्रशासकीय पातळीवर दखल घेतली जात नसल्याने छावा क्रांतिवीर सेना आक्रमक झाली आहे. शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दोन दिवसात निर्णय घ्या; अन्यथा कृषिमंत्र्यांच्या घरासमोर बोंबाबोंब आंदोलन छेडू, असा इशारा देण्यात आला आहे.

सरसकट कर्जमाफी, शेतीमालाला हमीभाव, ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’ या संस्थांना खरेदी प्रक्रियेतून दूर ठेवण्यात यावे. त्यांच्या संबंधित शेतकरी उत्पादक कंपन्यांचे महासंघ व कंपन्यांची सखोल चौकशी करावी, दोषी कंपन्यांना काळ्या यादीत टाकावे, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी तातडीने लागू कराव्यात, सोयाबीनला १० हजार रुपये हमीभाव द्यावा, अशा मागण्या आंदोलकांकडून करण्यात आल्या आहेत. मात्र उपोषणस्थळी कुणीही भेट दिली नसल्याने ही बाब अत्यंत दुर्लक्षित व शेतकऱ्यांचा अपमान करणारी असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

सोमवारी (ता. १९) सेनेचे अध्यक्ष करण गायकर उपोषण स्थळी उपस्थित झाल्यानंतर त्यांनी तहसीलदार आबा महाजन, शहर पोलीस निरीक्षक धीरज महाजन, सहायक निबंधक राजपूत यांच्याशी संपर्क साधत उपोषणस्थळी बोलावले. गायकर यांनी प्रशासनास दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.

दोन दिवसांत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि संबंधित कृषी अधिकारी यांनी उपोषण स्थळी येऊन समाधानकारक निर्णय घेतला नाही, तर कृषिमंत्र्यांच्या घरासमोर बोंबाबोंब आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. या वेळी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Refilling of Hand Pump: शिरोळ तालुक्यात ५० हातपंपांचे होणार पुनर्भरण

Maharashtra Rain: कोल्हापूरच्या पश्चिम भागात समाधान; पूर्व भागात चिंता

Dhule Crop Loan: धुळ्यात खरीप पीक कर्जवाटप ५७ टक्क्यांवर

Groundnut Sowing: पावसाची तूट, तरी भुईमुगाची पेरणी स्थिर

Giroli Gaav News: आदर्श ग्राम उपक्रमांतंर्गत गिरोली येथे शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद

SCROLL FOR NEXT