ॲग्रो विशेष

Unseasonal Rain : मोखाड्यातील शेतकरी पावसामुळे हवालदिल

Crop Damage : मागील दोन दिवस पावसांने तालुक्याला झोडपून काढले. त्यामुळे भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.

Team Agrowon

Mokhada News : मोखाडा : मागील दोन दिवस पावसांने तालुक्याला झोडपून काढले. त्यामुळे भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे दाणादाण उडाली आहे. खळ्यावर रचून ठेवलेले तसेच शेतात कापून ठेवलेले पीक भीजले आहे.

तर काही शेतकऱ्यांनी खळ्यावर रचून ठेवलेल्या उडवीवर प्लास्टिकचे आवरण टाकून पीक वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. दोन दिवस झालेल्या पावसाने हाता-तोंडाशी आलेले पीक हिरावण्याची भिती निर्माण झाली. तसेच सायंकाळी भरून येत असलेल्या आभाळामुळे मोखाड्यात शेतकरी हवालदिल झाले आहेत.

आदिवासी ग्रामीण भागात पावसाच्या पाण्यावर केवळ खरीपाचेच पीक घेतले जाते. त्याला नेहमीच पावसाचा लहरीपणा मारक ठरतो आहे. याही वर्षी, पावसाच्या लहरीपणाचा फटका खरीप हंगामाला बसला आहे. मोखाड्यात गुरूवार आणि शुक्रवारी सतत दोन दिवस पाऊस कोसळला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली आहे.

सद्यस्थितीत खरीपाचे पीक, कापणी करून शेतात ठेवणे, त्यानंतर ते खळ्यावर आणून त्याची उडवी रचून ठेवण्याचे काम सुरू आहे. शेतकऱ्याची ही लगबग सुरू असताना पाऊस कोसळल्याने शेतात कापून ठेवलेले पीक पाण्यावर तरंगु लागले आहे. गरव्या तसेच काही अंशी हळव्या भात पीकाला फटका बसला आहे. पावसाने मोखाड्यातील खरीपाचे सुमारे १३ हजार हेक्टर क्षेत्र बाधीत झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई मिळण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

मोठ्या प्रमाणात कापणी केल्यानंतर आता आलेल्या पावसाने कापलेले पूर्ण भातपीक भिजले आहे. तर काही भात पिक पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेले आहे.

कापणी केली तर पाऊस पीक् वाया घालवतो आणि कापणी नाही केली तर भातपीक वाया जाईल ही भीती असल्याने शेतकऱ्यांनी नक्की करावे काय? हा प्रश्न पडला आहे.
- सुरेश दत्तु डंबाळी (यशवंतनगर, शेतकरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Heatwave: ‘वैशाख वणव्या’पूर्वीच होरपळ

Unseasonal Rain Relief GR: अवकाळीग्रस्त ९ जिल्ह्यांतील ६६ हजार शेतकऱ्यांना मोठा दिलासा, ५३ कोटी ७३ लाख मदत मंजूर

Cotton, Soybean Rate: हळदीच्या भावात सुधारणा होण्याचे संकेत आहेत का ?

Village Development: गावच्या विकास निधीसाठी आता ग्रामसेवकांचे प्रमाणपत्र अनिवार्य

Silk Production: ‘महारेशीम अभियाना’ला नांदेड जिल्ह्यात प्रतिसाद: वडवळे

SCROLL FOR NEXT