Satara Rabi Sowing : शेतकऱ्यांची चिंता वाढली; सातारा जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरण्या अजूनही संथ गतीने सुरू
Maharashtra Farmers : सातारा जिल्ह्यात यंदा परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने शेतीतील ओलावा झपाट्याने कमी झाला असून, रब्बी हंगामातील पेरण्या संथ गतीने सुरू आहेत. ओलाव्याअभावी बियाण्यांची उगवणक्षमताही घटल्याने शेतकरी चिंतेत आहेत. जिल्ह्यात दोन लाख आठ हजार ७१८ हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी केवळ ३८ टक्के म्हणजेच ८० हजार १७१ हेक्टर क्षेत्रावरच पेरणी होऊ शकली आहे.
Latest agriculture department report on Rabi crop sowing in SataraAgrowon