Farmers protest Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Rates : सोयाबीन, धान आणि मक्याच्या किमतीवरून शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार; मंडई आणि तोलाई केंद्रांवर करणार आंदोलन

Farmers' Protest : पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार २४ ते ३० सप्टेंबर या कालावधीत प्रत्येक गावात मशाल मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्याचबरोबर सोयाबीन, धान आणि मक्याच्या किमतीवरून मंडई आणि तोलाई केंद्रांवर केले जाईल अशी माहिती एसकेएम नेत्यांनी दिली आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : मध्य प्रदेशामध्ये सध्या सोयाबीनच्या दरावरून शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. अशातच आता सोयाबीन, धान आणि मक्याच्या किमतीवरून संयुक्त किसान मोर्चाने आंदोलन अधिक तीव्र करण्याची तयारी केली आहे. तर सोयाबीन, धान आणि मक्याच्या किमतीसाठी रविवार (ता.२९) महत्वाची बैठक झाली. यावेळी मंडई आणि तोलाई केंद्रांवर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सध्या मध्य प्रदेशामध्ये सोयाबीनच्या दराचा प्रश्न चांगलाच तापलेला आहे. सोयाबीन दरासाठी येथे २४ ते ३० सप्टेंबर या कालावधीत प्रत्येक गावात मशाल रॅली काढण्यात येत आहे. तर या मशाल रॅली मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होत आहेत. मात्र सरकार काही शेतकऱ्यांची मागणी ऐकत नसल्याचे दिसत आहे. यामुळे आता मध्य प्रदेशात सुरू असणाऱ्या शेतकऱ्यांच्या लढ्याला अधिक तीव्र करण्याची योजना संयुक्त किसान मोर्चाने आखली आहे. संयुक्त किसान मोर्चाने रविवारी बैठक घेतली. यावेळी शेतकरी नेत्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर एकत्र येण्याची घोषणा केली आहे.

या बैठकीत पावसामुळे पिकांचे झालेले नुकसान तसेच कापणीच्या कामामुळे आंदोलनाच्या तारखांमध्ये बदल करण्यावर चर्चा करण्यात आली. तसेच तसेच मंडई आणि तोलाई केंद्रांवर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी एसकेएम नेत्यांनी, २४ ते ३० सप्टेंबर या कालावधीत प्रत्येक गावात मशाल रॅली काढली जाईल. यात शेतकरी सहभागी होतील, अशी माहिती देण्यात आली.

यावेळी १ ऑक्टोबर रोजी संपूर्ण राज्यात करण्यात येणाऱ्या चक्का जाम आंदोलनास तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. तर उर्वरित कार्यक्रम गावपातळीवर पूर्वीप्रमाणे कोणताही बदल न करता सुरू राहतील. तर सोयाबीनच्या भावासह धान आणि मक्याच्या भावावरही आंदोलन करण्यात येतील, असा निर्णय घेतल्याचे एसकेएमच्या वतीने सांगण्यात आले.

सोयाबीनचा भाव ६ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत करावा. धान आणि मक्याला रास्त भाव मिळावा अशा मागण्यांसाठी संपूर्ण राज्यात शेतकरी आंदोलन करत आहेत. याच आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून मंडई आणि तोलाई केंद्रांवर आंदोलन करण्यात येणार आहे. खरीप खरेदी केंद्रांवर अनियमिततेच्या तक्रारीवरून आंदोलन करण्यात येणार आहे.

किसान सन्मान निधीत वाढ?

यादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी (ता.२७) हरियाणात केंद्राच्या किसान सन्मान निधी योजनेचा लाभ वाढवण्याचे आश्वासन दिले. त्यांनी केंद्राच्या किसान सन्मान निधी योजनेचा लाभ हरयाणातील शेतकऱ्यांसाठी ६ हजारावरून थेट १० हजार केले जाईल, असे म्हटले. पण ही वाढ पुन्हा हरियाणात भाजपचीच सत्ता आल्यास केली जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Rate In Maharashtra : कांदा निर्यात धोरणामुळेच दर घसरले असे म्हणता येणार नाही; लोकसभेत केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

Opposition MPs Protest: विरोधी खासदारांची काळे कपडे घालून संसद परिसरात निदर्शने, लोकसभा, राज्यसभेचे कामकाज तहकूब

El Nino Update : एल निनो मार्च २०२७ पर्यंत टिकण्याची ९७ टक्के शक्यता; अमेरिकेच्या हवामान संस्थेचा अंदाज

Rainwater Harvesting: पर्जन्यजल संधारण : महत्त्व, नियोजन अन् प्रभावी व्यवस्थापन

Smart Mango Farming: ९० एकरांतील व्यवस्थापन तंत्रज्ञानामुळे झाले सुलभ

SCROLL FOR NEXT