Aarthik Unnati Workshop Agrowon
ॲग्रो विशेष

Carbon Credit Farming : कार्बन क्रेडिट शेतीसाठी शेतकऱ्यांना एकत्र यावे लागेल

Aarthik Unnati Workshop : कार्बन शेती पद्धती पर्यावरणपूरक, उत्पादन खर्च कमी करणारी आहे. जमिनीतील कर्बाचे प्रमाण वाढल्यास शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळवून देणारी आहे.

Team Agrowon

Parbhani News : कार्बन क्रेडिट शेती पद्धती ही नवीन संकल्पना शेतकऱ्यांना सुलभरीत्या समजून सांगावी लागेल. कार्बन शेती पद्धती पर्यावरणपूरक, उत्पादन खर्च कमी करणारी आहे. जमिनीतील कर्बाचे प्रमाण वाढल्यास शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळवून देणारी आहे.

या अंतर्गतची प्रक्रिया खर्चिक आहे. त्यामुळे कार्बन क्रेडिट शेतीसाठी शेतकऱ्यांना गटांनी एकत्र यावे लागेल. शेतकरी उत्पादक कंपन्या मार्फत ही योजना राबविता येईल, असा सूर कार्बन शेतीच्या माध्यमातून साधा आर्थिक उन्नती यावरील कार्यशाळेत उमटला.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्यातर्फे मंगळवारी (ता. १२) ही एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या वेळी अध्यक्ष व उद्‍घाटन कुलगुरू डॉ. इंद्र मणी होते. संशोधन संचालक डॉ. जगदीश जहागीरदार, आत्माचे संचालक दौलत चव्हाण, सिजेम संस्थेचे सहसंस्थापक श्राजेश गुप्ता,

सिजेमचे व्यवस्थापन प्रकल्प उपप्रमुख सिद्धार्थ डाबी, मुख्य संशोधक डॉ. आनंद गोरे, डॉ. पपिता गौरखेडे उपस्थित होते. डॉ. इंद्र मणी म्हणाले, की बदलत्या हवामान स्थितीत मराठवाडा विभागातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नाची जोखीम कमी करण्यासाठी कार्बन क्रेडिट शेतीचे महत्त्व आहे. यामुळे पर्यावरणाचे रक्षण होईल.

जमिनीची सुपीकता वाढेल. शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळू शकेल. डॉ. जहागीरदार म्हणाले, ही नवीन संकल्पना शेतकऱ्यांना समजावून सांगावी लागेल. गुप्ता म्हणाले, की कार्बन शेती तीन वर्षे वय असलेल्या फळबागा तसेच इतर पिकांसाठी आहे.

यात आंतरपीक पद्धती, मल्चिंग, आच्छादन, ठिबक सिंचन, रासायनिक खतांचा वापर बंद केल्यास तसेच कीटकनाशकाचा वापर कमी केल्यास जमिनीतील कार्बन वाढेल. जमिनीत १ टन कार्बन जमा झाल्यास १ क्रेडिट मिळतो. डाबी म्हणाले, की कार्बन क्रेडिट नोंदणी तसेच इतर प्रक्रिय खर्चिक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एकत्र यावे लागेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nashik APMC: नाशिक बाजार समितीमध्ये गुंडांमुळे शेतकरी भीतीच्या छायेत

NCCF Payments Controversy: ‘एनसीसीएफ’कडून खरेदीदारांच्या देयकात अनधिकृतपणे कपात

Agri Service Centers Inspection: राज्यातील कृषी सेवा केंद्रांची तपासणी सुरू

Fertilizer Inspection: इंडोनेशियाकडून खत आयातीची चाचपणी

Land Registration Fees: वाटणीपत्राच्या नोंदणीसाठी शुल्कातून पूर्णपणे सूट

SCROLL FOR NEXT