Cotton rate Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Rate : अपेक्षित भाववाढीच्या आशेने शेतकऱ्यांनी कापूस ठेवलाय घरात

Cotton Market : आज ना उद्या कापसाला चांगला भाव मिळेल, या अपेक्षेने अंबड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन स्वतःच्या घरात साठवून ठेवला आहे.

Team Agrowon

Ambad News : आज ना उद्या कापसाला चांगला भाव मिळेल, या अपेक्षेने अंबड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन स्वतःच्या घरात साठवून ठेवला आहे. पण, अद्यापही कापसाला पाहिजे तसा भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.

शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकविलेल्या कापसाला आजघडीला सात हजार रुपये प्रति क्विंटल व सोयाबीनला साडेचार हजार रुपये प्रतिक्विंटल पेक्षा अधिक भाव अजूनपर्यंत मिळालेला नाही.

त्यातच शासनही शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव देण्यास तयार नाही. त्यामुळे शेतकरी अजूनही भाव वाढीच्या प्रतीक्षेत आहे. घरात कापूस, सोयाबीन साठवून ठेवायचे तरी किती दिवस? असा प्रश्न शेतकऱ्याला सतावत आहे. त्यातच घरात साठवून ठेवलेल्या कापसाचे शॉर्ट सर्किट, आग यापासून संरक्षण करताना शेतकऱ्यांची दमछाक होते आहे.

घरात साठवून ठेवलेल्या शेतमालाची विक्री होत नसल्याने भाव वाढीसाठीच्या अपेक्षेची जागा आता चिंतेने घेतली आहे. अनेक शेतकऱ्यांनी गत वर्षीचा कापूस अजूनही विक्री केलेला नाही.

आज ना उद्या भाव वाढतील, अशी अशा शेतकरी मनाशी बाळगून आहे. शेतकऱ्यांच्या मालाला शासनाकडून योग्य भाव मिळण्याची कोणतीच चिन्हे सध्यातरी दिसून येत नसल्याने बळीराजाच्या काळजीत भर पडली आहे.

सरकार सध्या देत असलेल्या भावामुळे केलेला खर्च देखील वसूल होत नाही. वातावरणात सतत होत असलेला बद्दल, बेमोसमी पाऊस, रोगराई यामुळे उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. यामुळे केलेला खर्चही वसूल होणे कठीण झाले आहे. यामुळे खर्चाचे आणि उत्पन्नाचे कोणतेच गणित जुळत नाही.
- किसनराव भवर, कापूस उत्पादक, झिरपी
शेतात सुरुवातीपासून वेचणी केलेला ३० ते ४० क्विंटल कापूस आणि २५ ते ३० क्विंटल सोयाबीन घरात साठवून ठेवले आहे. मात्र बाजारात भाव पडलेले आहे. आता भाव कधी वाढतील केंव्हा व कापूस, सोयाबीन विक्री करावे तरी केंव्हा याच विवंचनेत सध्या आहे.
- शेषणारायन पाटील, शेतकरी, मार्डी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heavy Rain Alert : राज्यात आज पाऊस दणका देणार ; कोकण, घाटमाथ्यावर ऑरेंज तर राज्यभरात येलो अलर्ट

Agricultural Trade : भारत १४० कोटी लोकांचा देश तरीही आमच्याकडून एक पोत मका घेत नाही?; ट्रम्प यांच्या मंत्र्याचा सवाल

Sugar Export : साखर निर्यातीचा मार्ग मोकळा होणार?

Toll Road India : ‘टोल’धाडीचे राजकीय अर्थशास्त्र

Return Monsoon : गेले परतीच्या वाटे...

SCROLL FOR NEXT