Bacchu Kadu Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Election 2024 : शेतकरी, शेतमजूर ही आमची ताकद : बच्चू कडू

Bacchu Kadu : शेतकरी आणि मजूर आमची ताकद आहे. त्यामुळे शेतकरी आणि मजुरांसाठी आम्ही काहीही करण्यास तयार आहोत.

Team Agrowon

Ahilyanagar News : शेतकरी आणि मजूर आमची ताकद आहे. त्यामुळे शेतकरी आणि मजुरांसाठी आम्ही काहीही करण्यास तयार आहोत. शेतकरी, ऊस उत्पादकांवर अन्याय झाला, तर तो आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी येथे दिला.

नेवासा येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या प्रचारासाठी आमदार श्री. कडू यांची सभा झाली. आमदार श्री. कडू म्हणाले, ‘‘नेवाशा विधानसभा मतदार संघात काहीही झालं तरी बाळासाहेब मुरकुटे हे जिंकणारच आहेत.

शंकरराव गडाखांना हरविल्याशिवाय ते राहणार नाहीत. या तालुक्यात उसाला टनाला पाचशे रुपये कमी दिले. त्याचा बदला शेतकरी घेतील.’’ ‘‘शनिशिंगणापूर सारख्या पवित्र ठिकाणी भ्रष्टाचार करणाऱ्यांना माफी नाही. दादागिरी खपवून घेणार नाही. मी सहा महिन्यांनी येथेच येईन.

येणारे सरकार हे महाशक्तीचे, प्रहारचे असेल. आघाडी आणि युतीत पूर्ण बिघाडी झालेली आहे. देवेगौडा सात खासदारांवर पंतप्रधान झाले होते. त्यामुळे सत्ता आमचीच असेल.

उसाला दर कसा भेटत नाही ते पाहू, दिव्यांगांना महिन्याला सहा हजार देण्याचा, ग्रामीण भागात घरकुलाची रक्कम पाच लाख व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत,’’ असे श्री. कडू म्हणाले.

श्री. मुरकुटे म्हणाले, ‘‘शेतकरी आणि मजुरांसाठी आम्ही वट्टेल ते करू. सरकार कुणाचेही असो, हुकूमत आमची असेल. या वेळी ऊसदराचे शेतकऱ्याचे पाचशे रुपये दिले नाहीत, तर आम्ही लढा उभारू.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rahul Gandhi: देशात आर्थिक संकटाचं वादळ येतंय, शेतकऱ्यांना झळ बसणार, राहुल गांधींनी व्यक्त केली चिंता

Farmer Protest: जामसंडेत आंबा-काजू बागायतदारांचे आंदोलन

Agricultural Awareness Program: सोनवळा येथे विज्ञानाधारित निविष्ठा जागरूकता कार्यक्रम

Wedding Book Gifting: फेट्यांच्या मानपानाऐवजी पुस्तकरूपी भेट

Nutrient Management: शास्त्रोक्त अन्नद्रव्य व्यवस्थापन काळाची गरज : तांबडे

SCROLL FOR NEXT