Maharashtra Election Campaign : लातुरात लोकप्रतिनिधींच्या थेट संपर्काचा मुद्दा ऐरणीवर

Maharashtra Election 2024 : विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असतानाच लातूर शहर व ग्रामीण विधानसभा मतदार संघात सत्ताधारी आमदारांच्या विरोधात विरोधकांनी त्यांचा थेट नागरिकांशी नसलेल्या संपर्काचा मुद्दा चांगलाच ऐरणीवर आणला आहे.
Maharashtra Eelction
Maharashtra EelctionAgrowon
Published on
Updated on

Latur News : विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असतानाच लातूर शहर व ग्रामीण विधानसभा मतदार संघात सत्ताधारी आमदारांच्या विरोधात विरोधकांनी त्यांचा थेट नागरिकांशी नसलेल्या संपर्काचा मुद्दा चांगलाच ऐरणीवर आणला आहे.

मतदार संघातील नागरिकांकडूनही ही तक्रार होत असली तरी आमदार तसेच लोकप्रतिनिधींच्या थेट संपर्काआड येणाऱ्या कार्यकर्त्यांवरच नागरिकांचा मोठा रोष आहे.

हे कार्यकर्तेच आमदारांचा संपर्क होऊ देत नसल्याची तक्रार नागरिकांची असून कार्यकर्त्यांप्रती मतदारांमध्ये चीड दिसून येत आहे. याच मुद्दावरून दोन्ही मतदार संघांत सध्या प्रचारात रंगत भरली आहे.

दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा हा मूळ मतदार संघ आहे. फेररचनेत मतदार संघाचे दोन भाग झाले व रेणापूर तालुक्याच्या समावेशाने लातूर ग्रामीण तर लातूर शहराचा प्रमुख भाग असलेला शहर मतदार संघाची निर्मिती झाली. फेररचनेपासून दोन्ही मतदार संघांवर देशमुखांचे पर्यायाने काँग्रेसचे वर्चस्व आहे.

Maharashtra Eelction
Maharashtra Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीत ‘खटाखट’ गाजरांचा पाऊस

मतदार संघांतील सहकारी साखर कारखाने, संस्था व जिल्हा बँकही देशमुखांच्या ताब्यात असून एक खासगी साखर कारखानाही देशमुखांचाच आहे. मतदार संघात काँग्रेसचे गावागणिक प्रमुख चार ते पाच कार्यकर्ते आहेत. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गेले तरच नेतेमंडळी काम करतात, असा अलिखित नियम असल्याचे नागरिक सांगतात. जिल्हा बँकेचे कर्ज असो वा साखर कारखान्याचा शेअर असो, कार्यकर्त्यांची मध्यस्थी ठरलेली.

आधी त्याच्या पाया पडावे लागते व त्यानंतर त्याच्यासमवेत जाऊन नेत्याच्या पायावर डोके ठेवावे लागते. तेव्हा कुठे काम होत असल्याचा अनुभव लोकांकडे आहे. काही वर्षांत मोबाइलमुळे संपर्क सहज झाला. त्यामुळे लोकप्रतिनिधी लोकांना सहज उपलब्ध होऊ लागले. दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख हेही लोकांनी त्यांना मोबाइलवरून संपर्क साधल्यास प्रतिसाद द्यायचे.

सामान्य व्यक्तीही त्यांना कॉल करून काम सांगायचा व ते त्याचे काम करायचे. बाजूच्या धाराशिव व बीड जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधींकडून त्यांना थेट संपर्क साधल्यानंतर लोकांना मिळालेला प्रतिसाद तसेच दोघांतील कॉल रेकॉर्डिंग व लोकप्रतिनिधींनी कामाशी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्याला केलेले संभाषण सोशल मीडियावर ऐकायला मिळू लागले.

मात्र, आमदार अमित देशमुख व आमदार धीरज देशमुख यांच्याबाबतीत अशा संपर्काचा अभाव हाच मुद्दा सध्या निवडणूक प्रचारात तेजीत आहे. विरोधकांनी तोच मुद्दा पुढे करून शहर मतदार संघात सलग चौथ्यांदा नशीब आजमावत असलेले काँग्रेसचे उमेदवार आमदार अमित देशमुख तर दुसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरलेले आमदार धीरज देशमुख यांना घेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

Maharashtra Eelction
Maharashtra Election 2024 : सिंचनासाठी पाणी, वीज, शेतरस्त्यांच्या समस्या वर्षानुवर्षे कायम

कार्यकर्त्यांचीच मूळ अडचण

लोकप्रतिनिधींना निवडणूक प्रचारासाठी कार्यकर्त्यांना सांभाळावे लागते. असे असले तरी लोकप्रतिनिधी थेट लोकांच्या संपर्कात असतात. लातूर शहर व ग्रामीण मतदार संघात आमदार देशमुख बंधू मात्र, याला अपवाद आहेत. लोकांशी संपर्कासाठी ते कार्यकर्त्यांचे माध्यम वापरताना दिसतात.

नागरिकांना मात्र, आमदार देशमुखांपेक्षा त्यांच्याजवळ जाऊ न देणाऱ्या कार्यकर्त्यांची चीड आहे. कार्यकर्त्यांचाच जास्त बोलबोला आहे. यामुळेच निवडणुकीत कार्यकर्त्यांनाच धडा शिकवण्याची गरज नागरिकांतून व्यक्त होत आहे. हार्वेस्टरने ऊस तोडणीसाठी शंभरहून अधिक हार्वेस्टर वाटप कारखान्यांच्या हमीवर जिल्हा बँकेने केले. एका हार्वेस्टरसाठी बँकेने एक कोटींहून अधिक कर्ज दिले. याचा लाभ कार्यकर्त्यांनाच झाल्याचे नागरिक सांगतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com