Agriculture Commissioner  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Commissioner : कृषी आयुक्तांसमोर शेतकऱ्यांचा समस्यांचा पाढा

Farmers Issue : कृषी आयुक्त गेडाम दोन दिवसाच्या सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी माढा, उत्तर सोलापूर, मंगळवेढ्यातील काही प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतीला भेटी दिल्या.

Team Agrowon

Solapur News : बेदाणा शेडच्या अनुदानात वाढ करा, प्रक्रिया उद्योगाला अनुदान वाढवून द्या, कांद्याच्या घसरत्या दरावर उपाय करा, माळढोक अभयारण्याच्या परिसरातील शेतीला रानडुकरांचा मोठ्या प्रमाणात त्रास होतोय, त्यावर प्रतिबंध करा, यासारख्या व्यथा राज्याचे कृषी आयुक्त प्रवीण गेडाम यांच्यासमोर शनिवारी (ता. ३) शेतकऱ्यांनी मांडल्या.

त्या योग्य पद्धतीने समजून घेऊन, त्यावर काय उपाय आहे, अशी विचारणा करताना, आपणही त्याचा अभ्यास करु आणि योग्य तो मार्ग काढू, असे आश्वासन गेडाम यांनी शेतकऱ्यांना दिले.

कृषी आयुक्त गेडाम दोन दिवसाच्या सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी माढा, उत्तर सोलापूर, मंगळवेढ्यातील काही प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतीला भेटी दिल्या. काही शेतकरी कंपन्यांच्या उत्पादनांची माहिती घेतली.

तसेच शेतकऱ्यांशीही चर्चा करुन त्यांचे प्रश्न समजून घेतले. विभागीय कृषी सहसंचालक रफिक नाईकवाडी, आत्माचे प्रकल्प संचालक मदन मुकणे, उपविभागीय अधिकारी भारत कटके, उत्तर सोलापूरच्या तालुका कृषी अधिकारी मनिषा मिसाळ, दक्षिण सोलापूरचे तालुका कृषी अधिकारी आर. बी. माळी यावेळी उपस्थित होते.

शनिवारी सकाळी त्यांनी नान्नजचे कृषिभूषण दत्तात्रय काळे यांच्या द्राक्षशेतीला भेट दिली. यावेळी दत्तात्रय काळे यांनी आतापर्यंत विकसित केलेल्या विविध वाणांची आणि त्यांच्या गुणवैशिष्ट्यांची माहिती घेतली. तसेच नव्याने तयार केलेल्या किंगबेरी वाणाचीही आवर्जून विचारणा केली.

त्यानंतर बेदाणाशेडची पाहणी केली. बेदाण्याची निर्मिती नेमकी कशी होते, त्याचे मार्केट कुठे आहे, निर्यातीतला प्रतिसाद कसा असतो, यासारखे विविध प्रश्न विचारत त्याची अधिक माहिती त्यांनी काळेंकडून जाणून घेतली.

शिवाय त्यातील अडचणीही जाणून घेतल्या. यावेळी बेदाणा शेडच्या उभारणीला ३५ टक्के अनुदान आहे, पण सध्याच्या महागाईच्या काळात ते कमी आहे. द्राक्षाचे एकूण उत्पादन आणि बेदाण्याच्या मूल्यवर्धनातून निर्माण झालेले मार्केट विचारात घेता, बेदाणा मार्केटला मोठा वाव मिळू शकतो, हे त्यांच्या निदर्शनास आणण्यात आले.

त्याशिवाय उत्तर सोलापुरातील नान्नज, मार्डी, अकोलेकोटी, कोडी, गुळवंची, कारंबा या भागात माळढोक अभायरण्यातील रानडुकरांचा शेतपिकांना मोठा त्रास होतो, याबाबत काही शेतकऱ्यांनी माहिती दिली. तेव्हा याबाबत काय उपाययोजना करावी लागेल, ती सांगा, मीही अभ्यास करुन योग्य तो मार्ग काढू, असे आश्वासन त्यांनी दिले.

कांद्याचा नजरअंदाज अहवाल योग्य हवा

कांद्याचे दर घसरलेले आहेत, हे वारंवार घडते, याकडे लक्ष वेधताना मूळात कांद्याच्या क्षेत्राबाबत नजरअंदाज घेताना चुकीची माहिती दिली जाते, कांद्याचे नेमके क्षेत्र किती आणि किती कांदा बाजारात येणार याचा अंदाज येत नसल्यानेच दर कोसळतात, त्यासाठी गावपातळीवर नजरअंदाज अहवाल योग्य पद्धतीने तयार व्हायला हवा, असा मुद्दा त्यांच्यासमोर मांडण्यात आला. तेव्हा त्याबाबत त्यात काय बदल करता येतील का, हे पाहू, असे आश्वासन त्यांनी दिले.

विठ्ठलगंगा शेतकरी कंपनीला भेट

कृषी आयुक्त गेडाम यांनी या दौरयात निमगाव येथील विठ्ठलगंगा फार्मर्स प्रोड्युसर कंपनीलाही भेट दिली. शेतकरी कंपनीमार्फत सुरू असणाऱ्या शेतकरीभिमुख उपक्रमाची माहिती घेतली आणि कंपनीच्या सुरू असणाऱ्या पॅक हाउस आणि कोल्ड स्टोअरेजच्या विभागाची पाहणी केली. त्याशिवाय आकुंथा स्टोअर, मध्यवर्ती प्रयोगशाळा, बीज प्रक्रिया विभाग, प्रशिक्षण केंद्र आदी सुविधांची माहिती घेतली यावेळी कंपनीचे सर्व संचालक आणि काही शेतकरी सभासद उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT