Maharashtra Agriculture Awards Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Awards : सरकारच्या कृषी पुरस्कार गोंधळ; शेतकऱ्यांच्या रोषानंतर कार्यक्रम सुरू

Agriculture Minister Dhananjay Munde : कृषी पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम रविवारी (ता. २९) मुंबई येथील नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया (डोम) वरळी येथे सुरू होता. यावेळी शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत राडा घातला.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत आयोजित कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यात काही काळ गोंधळ झाला. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी कार्यक्रमासाठी फक्त ३० मिनिटे दिल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता. यामुळे कार्यक्रम काही काळ थांबला. पण राज्यपाल यांनी आपण सर्वांनाच पुरस्कार देऊ असे आश्वासन दिल्यानंतर आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांची समजूत काढल्यानंतर कार्यक्रम सुरू झाला. हा कार्यक्रम मुंबई येथील नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया (डोम) वरळी येथे आयोजित करण्यात आला होता.

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यातील कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती, संस्था तसेच अधिकारी व कर्मचारी यांना कृषी पुरस्कार दिला जातो. सन २०२०, २०२१ व २०२२ या तीन वर्षांतील एकूण ४४८ पुरस्कार राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते देण्यात येणार होते. तर यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार होते. मात्र प्रत्यक्ष कार्यक्रमावेळी फक्त राज्यपाल, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडे उपस्थित होते.

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या नियोजित दौऱ्यामुळे त्यांनी आधी एक तास आणि कार्यक्रमावेळी फक्त अर्धा तास दिला. तर कार्यक्रमात फक्त राज्यपालांचे हस्ते काहीच पुरस्कार देण्यात आले. यावरून शेतकऱ्यांमध्ये संताप उसळला. शेतकऱ्यांनी भर कार्यक्रमात फेटे उडवून याचा निषेध केला. यावेळी धनंजय मुंडे यांनी राज्यपाल महोदयांना नागपूरला जायचं असल्याने कार्यक्रम वेळ वाढवली नाही. मात्र सर्व शेतकऱ्यांना राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार देऊ अशी ग्वाही दिली. तर राज्यपाल राधाकृष्णन यांनी देखील सर्वांना पुरस्कार देऊन पुढे जाऊ असे आश्वासन दिल्यानंतर पुरस्कार वितरण सोहळा सुरळीत सुरू झाला.

दरम्यान याआधी कृषी पुरस्कार सोहळ्यासाठी मुंबईत गेलेल्या शेतकऱ्यांची योग्य सोय झाली नव्हती. यावरून देखील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता. त्यांना राहण्यासाठी हॉटेल उपलब्ध झाले नव्हते. यानंतर आता कार्यक्रमात फक्त काही लोकांनाच पुरस्कार देऊन शेतकऱ्यांची चेष्ठा राज्य सरकारने केली. यामुळे शेतकऱ्यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यासमोरच रोष व्यक्त केला. तसेच राज्यपालांच्याच हस्ते पुरस्कार देण्याची मागणी केली. तर पुरस्कारासाठी बोलवून सरकारने अपमान केल्याची भावना काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमांमध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार (१), वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार (८), जिजामाता कृषी भूषण पुरस्कार(८), कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार (८), वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार (८), उद्यान पंडित पुरस्कार(८), वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (४०), पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषिसेवा रत्न पुरस्कार (१०), युवा शेतकरी पुरस्कार(८), अन्नधान्य, कडधान्य व गळीत धान्य पिकांच्या राज्यांतर्गत पीक स्पर्धा योजनेतील पुरस्कार वितरित करण्यात येणार होते.

शासनाने पुरस्कार सोहळ्या दरम्यान योग्य काळजी घेतली नाही. फाईव्ह स्टार हॉटेलच्या नावाखाली छोट्याशी हॉटेलमध्ये शेतकऱ्यांना थांबवले. येथे जेवनाची योग्य सोय नव्हती. तसेच स्वच्छताही नव्हती.
-ज्ञानेश्वर ढोले, पुरस्कार प्राप्त शेतकरी
राज्य सरकारने आम्हा शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी येथे बोलावले होते. मात्र येथे जेवनापासून राहण्यापर्यंत कोणतीच व्यवस्था केली नाही. यामुले लहान बालकांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांची गैरसोय झाली. सरकारने शेतकऱ्यांसह या पुरस्कारांचा अपमान केला.
-सचिन कोरडे, पुरस्कार प्राप्त शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chana Market Rate: सध्या हरभऱ्याचा भाव हमीभावापेक्षा ८०० ते ११०० रुपयांपेक्षा कमी

Irrigation Management: सिंचन व्यवस्थापन अराजकतेच्या वळणावर

Smart Farming: पपई- मिरची- खरबूज पद्धतीतून उत्पन्नाचा हुकमी स्रोत

Dairy Farming Success Story: दुग्ध व्यवसाय हेच झाले माझे विश्‍व

Fertilizer Subsidy: खत अनुदान थेट शेतकऱ्यांना देणे शक्य; डीबीटी यंत्रणा उभारण्याच्या कृषिमंत्र्यांच्या सूचना

SCROLL FOR NEXT